तरुण भारत

ट्विटरकडून लिमिट रिप्लाय फिचर

: आतापर्यंत ट्विटरवर पब्लिक ट्वीटवर कोणालाही रिप्लाय करण्याची सोय उपलब्ध होती परंतु आता नवीन फिचरमुळे ट्विट करताना नवीन नियम वापरावे लागणार असून त्याच्यासाठीचे नवीन फिचर सादर करण्यात आले आहे. ही सेवा सर्व ग्राहकांसाठी आणि भारतामध्येही वापरता येणार आहे.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ट्विटरने जागतिक पातळीवर नवीन फिचर सादर केले आहे. या फिचरमध्ये जे लोक ट्विटरवर ऑनलाईन बुलिंगच्या कारणामुळे चिंतेत आहेत. त्याच्यासाठी ही बाब फायदेशीर ठरणार आहे. कारण या फिचरच्या मदतीने ग्राहक आपले खाते स्वतःच नियंत्रित करु शकणार आहेत. कोणत्या ट्वीट्ला उत्तर द्यावयाचे का नाही किंवा सदर चर्चेत भाग घेण्याविषयी ठरविण्याचा अधिकारही त्यानाच राहणार असल्याचे सांगितले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरचे फिचर कन्वर्सेशनमधील लोकांना नियंत्रित ठेऊ शकणार आहे. या नवीन सुविधांमध्ये आयओएस, अँड्राइड आणि twitter.com वर ट्विटरचा वापर करुन सर्व लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Related Stories

जानेवारीमध्ये निर्यात 5 टक्क्यांनी वाढली

Patil_p

पाच महिन्यात चिनी उद्योगाचा नफा 19 टक्क्मयांनी घसरला

Patil_p

बाजारात तेजीचा प्रवास कायम

Patil_p

‘कोरोना कवच’ आरोग्य विमा पॉलिसी उतरविताना

Omkar B

अजय भुटोरिया झेन्सारचे नवे सीईओ

Omkar B

कर संकलनामध्ये 22.5 टक्क्मयांची घसरण

Patil_p
error: Content is protected !!