तरुण भारत

कोल्हापूर : दोघा चोरटयांना अटक; २७ लाखांचा ऐवज जप्त

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहर आणि उपनगरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, चोरीचे सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह, चार चाकी गाडी, एक पिस्तुल, १३ जिवंत काडतुसे असा सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेकॉडवरील गुन्हेगार प्रशांत काशीनाथ करोशी ( वय ३५, रा. इस्पुर्ली, ता.करवीर, जि. कोल्हापूर), त्याचा साथीदार अविनाश शिवाजी आडेवकर ( वय २८, रा. धामणे, ता. आजरा, जि. कोल्हापूर ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या दोघाना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

पोलीस निरीक्षक सावंत म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात घरफोडीसारखे गुन्हे घडू नयेत, यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली जात होती. यादरम्यान, या आधीही घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला प्रशांत करोशी ( रा. इस्पुर्ली) हा चोरीची गाडी घेऊन कोल्हापुरात येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली होती. त्याला शिये फाटा परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडील गाडीची झडती घेतली असता, गाडीमध्ये हायड्रॉलिक जॅक, ऑक्सिजन सिलेंडर सेट, कटावणी असे चोरी करण्यासाठीचे साहित्य मिळून आले. त्यावरुन त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान त्याने आपला मित्र अविनाश आडेवकर (रा. धामणे, ता.आजारा) याच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यावरुन आडेवकरचा शोध घेवून त्यालाही जेरबंद करण्यास यश आले.

विशेष म्हणजे या दोघाच्याकडे केलेल्या चौकशीत जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकर याच्या घरात धाडसी चोरी करुन, त्याच्या घरातून रोकड, दागिने आणि पिस्तुल व जिवंत काडतुसावर डल्ला मारला होता. या घरफोडीबरोबर शहरातील जुना राजवाडा, करवीर, राजारामपुरी आणि शाहूपुरी या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अकरा घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे तपासात उघड झाले.

Advertisements

बांदिवडेकरांच्या घरात चोरी

जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकर याच्याच घरात या दोघांनी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. बांदिवडेकरच्या घरातून रोकडसह सोन्या चांदीचे दागिने व पिस्तुल चोरीस गेले होतो. त्याचा गुन्हा करवीर पोलिसात नोंद आहे. मात्र, पिस्तुलची चोरी झाल्याची नोंद नाही. त्यामुळे धाडसी घरफोडीचा याचा सखोल तपास करण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत.

बँक फोडण्याची तयारी

चोरटा प्रशांत करोशी याने हायड्रॉलिक जॅक साहाय्याने कोल्हापुरातील बँक फोडण्याच्या तयारीत केली. याकरीता त्याने काही दिवसांपूर्वी पुणे येथून हायड्रॉलिक जॅक खरेदी केला होता. ज्याच्या साहाय्याने तो बँक फोडण्यासाठी कोल्हापुरात येत असताना पोलिसाच्या हाती अलगद सापडला. शहरातील ती बॅक फोडण्याचा त्याचा प्रयत्न फसल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली.

Related Stories

शेतकरी विधेयकाला संघटीत विरोध करा : डॉ. गणेश देवी यांचे आवाहन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 44 बळी, नव्या रूग्णांत घट

Abhijeet Shinde

…तर रुग्णांचा आकडा दिवसाला 24 हजार पर्यंत जाईल – पालकमंत्री

Sumit Tambekar

कोल्हापूर हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव पाठवा – आ. चंद्रकांत जाधव

Abhijeet Shinde

कोडोलीत रात्री सात पर्यन्त दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरात गांजाच्या नशेत हल्ला, तोडफोडीचे प्रकार

Sumit Tambekar
error: Content is protected !!