तरुण भारत

स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूट देशात प्रथम

फ्लाईंग व्हेईकलेचे डिझाईन : देशभरातून 1720 संघाचा सहभाग

जयसिंगपूर/ प्रतिनिधी 

Advertisements

स्मार्ट इंडिया हॅकथॉन-2020 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी बनविलेल्या ‘अल्ट्रा कॉम्पॅक्ट पर्सनलाईज्ड फ्लाईंग व्हेईकल’चे डिझाईन उत्कृष्ट ठरले. ऑगष्टच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धा झाल्या. यामध्ये देशभरातील 1720 संघ व 8600 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना एक लाखाचे बक्षिस मिळाले.

मानव संसाधन विकास मंत्रालय व आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे (AICTE) स्पर्धेचे आयोजन केले होते. यात महाविद्यालयातील सुधांशू रणखांबे, आदित्य मगदूम, जुनेदअख्तर देसाई, कृपाल चव्हाण, ऋषिकेश खांडकोळे (मेकॅनिकल), स्नेहल हुलिकीरे (इलेक्ट्रीकल) या विद्यार्थ्यांनी ऑटोडेस्क कंपनीच्या कॅटेगरीत सहभाग घेतला होता. यामध्ये केंद्र सरकार, सर्व राज्य सरकार व विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी समस्यांचे उपाययोजन मागविले होते. 

सध्या जगभरामध्ये अत्यावश्यक सेवा त्वरीत देताना खूप अडचणी येतात. महापूर, भूकंप, सुनामी, मेडिकल एमर्जन्सी, मिलीटरी अॅप्लीकेशन्स अशावेळी ट्रॅफीक व दळणवळणाची अडचण येते. इतर हवाई सुविधांचा आकार व इतर पायाभूत सुविधा यांची समस्या येते. या समस्येवर उपाय म्हणून या विद्यार्थ्यानी चार महिने अविरत कष्ट करुन या ‘अल्ट्रा कॉम्पॅक्ट पर्सनलाईज्ड फ्लाईंग व्हेईकल’चे डिझाईन बनविले आहे.

संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थ्यी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. प्रोजेक्ट गाईड प्रा. अशिष देसाई, एस.आय.एच. समन्वयक प्रा. अवेसअहेमद हुसेनी यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.  

अशी आहेत डिझाईनची वैशिष्ट

विद्यार्थ्यांनी अत्यावश्यक व आपातकालिन काळात त्वरीत सेवा पोहचविण्यासाठी या फ्लाईंग कारचे डिझाईन केले आहे. हे व्हेईकल इंधन आणि प्रदुषण विरहित असे इलेक्ट्रीकल आहे. जगातील इतर व्हेईकलच्या तुलनेत आकार, वजन व किंमतीने हे डिझाईन अत्यंत कमी आहे. या व्हेईकलला बाईकसारखी सिटींग पोझीशन दिल्याने कम्पर्टेबल व स्टॅबीलीटी येते. आपातकालिन परिस्थीतीत मिनी पॅरॅशुट, रडार सिस्टीम, इमर्जन्सी स्वीच, SOS, अत्याधुनिक संपर्क यंत्राना देण्यात आल्याने सुरेक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक उपाययोजना आहेत. या व्हईकलला धावपट्टी व हेलीपॅडची आवश्यकता लागत नाही. थ्रीडी प्रिंटर तंत्रज्ञानाचा वापर करुन हे मॉडेल मॅन्युफॅक्चर करता येते. त्यामुळे भविष्यात आपतकालिन काळात या फ्लाईंग व्हेईकलचा उपयोग होईल. या टीमने जनरेटीव्ह डिझाईन, थ्रीडी प्रिटींग, सिम्युलेशन, अॅनिमेशन आणि अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा वापर केला. 36 तासाच्या या अंतिम स्पर्धेमध्ये ऑटोडेस्क कंपनीचे उच्च अधिकारी व कमिटीचा सहभाग होता. 

Related Stories

गणेशोत्सव समन्वय समितीची गरज

Abhijeet Shinde

जिल्हा बँक निवडणूक निकाल: निवडून आलेले उमेदवार असे…

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर

Abhijeet Shinde

दिल्लीतील शैक्षणिक अभ्यासगटात सीईओ चव्हाण यांची निवड

Sumit Tambekar

‘ सारथी ‘ ची स्वायत्तता खंडीत झाल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवार पासून सुरळीत होणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!