तरुण भारत

चिंता वाढली : महाराष्ट्रातील 11,920 पोलिसांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आपला जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करणारे पोलीस कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी 100 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Advertisements

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 147 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत 11 हजार 920 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 124 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 11,920 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1235 पोलीस अधिकारी आणि 10,685 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 9 हजार 569 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 952 पोलीस अधिकारी आणि 8617 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 


सद्यस्थितीत राज्यात 2227 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 272 पोलीस अधिकारी आणि 1955 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 124 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 पोलीस ऑफिसर आणि 113 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 


दरम्यान, 12 ऑगस्टला 264 तर 13 ऑगस्टला 381 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Related Stories

भारतीय सीमेजवळ चीनने उभारली 500 ‘मॉडेल व्हिलेज’

datta jadhav

सोलापूर : सोयाबीन रास करताना मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde

वाळवा तालुक्यात महिला, युवती कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

नेपाळ उभारणार 89 बॉर्डर आउटपोस्ट

datta jadhav

नाक्यावरचा बोर्ड करतोय राजकारण्याचं लक्ष विचलित

Abhijeet Shinde

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशभरात महाराष्ट्र पॅटर्न राबवावा : संजय राऊत

Rohan_P
error: Content is protected !!