तरुण भारत

अंतिम दिवशी सेन्सेक्सची 433 अंकांची घसरण

वृत्तसंस्था / मुंबई

चालू आठवडय़ाचा प्रारंभ हा तेजीसोबत झाला होता. परंतु त्याच्यानंतर काही दिवसात देशातील शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव, जगातील विविध शेअर बाजाराचा कल आणि देशातील कोरोनाचे चिंता प्राप्त करावयास लावणारे आकडे यांच्या प्रवासात सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यातील कंपन्यांचे समभाग दबावात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

सप्ताहाच्या अंतिम दिवशी बँकिंगचे ग्राहक तसेच वाहन क्षेत्राशी संबंधीत असणारे समभाग नुकसानीत राहिले आहेत. शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 433 अंकांनी घसरणीसह बंद झाला आहे.  जागतिक बाजारामधील विक्रीच्या प्रभावाने देशातील शेअर बाजार दबावात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 433.15 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,877.34 वर बंद झाला आहे तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 122.05 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,178.40 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. तर सोबत स्टेट बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मात्र सन फार्मा, एनटीपीसी, टाटा स्टील, टायटन आणि इन्फोसिस यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत.

प्रारंभीच्या कालावधीत बाजाराचा कल सकारात्मक राहिला होता. परंतु युरोपियन बाजारातील मोठय़ा नुकसानीच्या प्रभावामुळे देशातील बाजारात उलट सुलट वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. कारण यामध्ये पॅरिसचा फ्रँकफर्ट आणि लंडनचा बाजार दोन टक्क्मयांनी घसरला आहे. दुसरीकडे आशियाई बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे बाजार नुकसानीत राहिले आहेत. परंतु कोरोनाची वाढती संख्या ही गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण करीत असून हा काळ आगामी काही दिवस राहण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.

Related Stories

75 कोळसा खाणींचा होणार लिलाव

Patil_p

सोन्याच्या दरात 1650 रुपयांची घसरण

prashant_c

सर्वात मोठा फॅशन सेल लवकरच

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्सची 800 अंकांवर झेप

Patil_p

एअरटेल-अपोलो ऍप यांच्यात आरोग्य सेवेसाठी करार

Patil_p

पायाभूत विकासासाठी दूरगामी उपाय हवेत

Patil_p
error: Content is protected !!