तरुण भारत

प्लाज्मा दान करण्यासाठी पुढे या : मुख्यमंत्री

प्रतिनिधी/ पणजी

कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. सरकारतर्फे आरोग्य खात्याच्या वतीने गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली असून कोरोना महामारीच्या या संकटात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. त्याकरीता कोरोनमुक्त झालेल्यांनी मदतीचा हात पुढे करून प्लाझ्मा दान केल्यास इतर कोरोनरोग्यांना फायदा होऊ शकतो. अशा लोकांसाठी घरून नेण्याकरीता व पुन्हा घरी पोहोचविण्याकरीता वाहतूक सोय करण्यात आली आहे. त्याकरीता डॉ. प्रिती – 7875181284 किंवा मार्सेलिना – 9822791732 यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

बाणावली येथे तीन होडय़ांना आग

Omkar B

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलातर्फे गोव्यात कोरोना योध्दा दिवस विविध उपक्रमांनी साजरा

Omkar B

आपचे नेते राहुल म्हांबरे यांनी देव बोडगेश्वरच्या देवळात जाऊन घेतला आशीर्वाद

Patil_p

बेंगलोर एफसीची विजयाची प्रतीक्षा अखेर ईस्ट बंगालला नमवून संपली

Amit Kulkarni

काणकोणात दहावी परीक्षेचा पहिला दिवस सुरळीतपणे

tarunbharat

वझरी येथे जलवाहिनी फुटून पाणी वाया

Omkar B
error: Content is protected !!