तरुण भारत

धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी : सुब्रमण्यम स्वामी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

महेंद्रसिंह धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आज भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला 2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. 

Advertisements

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एम. एस. धोनी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, पण इतर कोणत्याही गोष्टीतून नाही. प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध लढण्याच्या त्याच्या प्रतिभेची आणि त्याने क्रिकेटमध्ये दाखवलेल्या संघाच्या प्रेरणादायी नेतृत्वाची सार्वजनिक जीवनात गरज आहे. त्यांनी 2024 मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लढवावी’.

Related Stories

टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा

Rohan_P

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार: भाजपचे वरिष्ठ नेते अस्वस्थ

triratna

काश्मीरमधील उरी येथे 25 कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

‘ही’ आहेत कोरोनाची नवीन सहा लक्षणे

datta jadhav

उत्तरप्रदेश : 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

datta jadhav

खोटी सही करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे काढणारी टोळी गजाआड

datta jadhav
error: Content is protected !!