तरुण भारत

सांगली : ‘सिनर्जी’मुळे वैद्यकीय पंढरीला ‘एनर्जी’ – जयंत पाटील

ऑनलाईन टीम / मिरज

कोरोना संसर्गजन्य आजाराने विशेष करुन वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेरची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या रोगाचा नायनाट करण्यासाठी जिह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती. ती सिनर्जी हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्णत्वास आल्याने ‘सिनर्जी’मुळे वैद्यकीय पंढरीला एक प्रकारची ‘एनर्जी’मिळाली असल्याचे गौरवोदगार राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांनी काढले.

सांगली – मिरज रस्त्यावर चंदनवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सिनर्जी मल्टीस्पेसालिटी या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उदघाटन स्वातंत्र्य दिनादिवशी नामदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त अशा सिनर्जी मल्टीस्पेसालिटी हॉस्पिटलमध्ये 18 विभाग असून, सांगली – मिरज परिसरातील 45 हून अधिक वैद्यकीय तज्ञ या रुग्णालयात सेवा देणार आहेत. रुग्णालयातच हेल्थपॉईंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल हे 50 बेडचे कोविड-19 सेंटरही सुरू केल्याचे यावेळी सिनर्जी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रविंद्र आरळी, कार्यकारी संचालक प्रसाद जगताप यांनी सांगितले.

Related Stories

तब्बल अठरा तासाच्या थरारानंतर गवा रेडा जेरबंद

Abhijeet Shinde

सांगली : वीज तोडणीवर पृथ्वीराज देशमुख यांनी काढला तोडगा

Abhijeet Shinde

पदवीच्या तिसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमांची परीक्षा लांबणीवर

Abhijeet Shinde

सामान्यांसाठी लढणारा लढवय्या योद्धा गमावला-जयंत पाटील

Sumit Tambekar

सांगली : मालगांव, बेळंकीत 55 हजारांचा दारुसाठा जप्त

Abhijeet Shinde

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चितळे उद्योग समुहाकडून एक कोटी पन्नास लाखाची मदत*

Abhijeet Shinde
error: Content is protected !!