तरुण भारत

सुनील गोडबोलेंची टाळेबंदी युक्ती ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण

मनोरंजन क्षेत्राला कोरोना टाळेबंदीच्या काळात अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. अतिशय बिकट अटी सांभाळत वाहिन्या आणि निर्मिति संस्थानी शूटिंगला सुरुवात केली. मात्र कलाकारांसाठी कोरोनाच्या या भीतियुक्त वातावरणात काम करणे जोखमीचे होते. त्याचबरोबर रोजचा प्रवास करणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणे. त्यात  सरकारी नियमांप्रमाणे 65 वयाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना सेटवर येण्यास मनाई होती. मात्र 64 वय असलेल्या अप्पा केतकरांना म्हणजेच ज्येष्ठ अभिनेता सुनील गोडबोलेंना हा नियम लागू नव्हता. पण कितीही झाल तरी कोरोनापासून जेष्ठ नागरिकांनी स्वत: ची काळजी घेण महत्वाचे होते. स्वत:च्या आरोग्याचे कारण देत अप्पांनी  काम बंद केले असते तर प्रेक्षकांची निराशा झाली असते कारण अप्पांची मालिकेमधील व्यक्तिरेखा खुप महत्वाची आहे. त्यामुळे झी युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे आवडते आप्पा सुनील गोडबोले (वय वर्ष 64) यांनी यावर एक नामी युक्ति योजली.

आप्पांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी एक मोठा निर्णय घेतला. आपल्या प्रेक्षक कुटुंबासाठी शूटिंग सुरु झाल्या दिवसापासून अप्पा स्वत:च्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहत आहे. त्यांनी झी युवा वाहिनी शी बोलून  शूटिंगच्या बंगल्या मध्येच स्वत:ची राहण्याची व्यवस्था करून घेतली. झी युवा वाहिनी आणि सोहम प्रोडक्शनने सुद्धा त्यांना आराम मिळेल अशी व्यवस्था करुन दिली. आज गेले 50 दिवस अप्पा असे राहत आहेत आणि त्यांनी योजेलेल्या युक्तिमुळे त्यांचे आरोग्य आणि शूटिंग ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण झाले.

Advertisements

Related Stories

लॉकडाऊन लग्न चित्रपटाची आमंत्रण पत्रिका प्रेक्षकांसाठी सज्ज

Patil_p

परिपूर्ण नाटय़ानुभव देणारी ‘जन्म एक व्याधी’

Patil_p

प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचे निधन

Rohan_P

वाघाचा शोध घेणार विद्या बालन

Patil_p

देबिनाने केलं टक्कल…

Patil_p

यश कधीच कायमस्वरुपी नसते!

Patil_p
error: Content is protected !!