तरुण भारत

लियांडर पेसच्या वेबसाईटचे उद्घाटन नवी दिल्लीत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचा अव्वल आणि अनुभवी ज्येष्ठ टेनिसपटू लियांडर पेसने शनिवारी देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या स्वत:च्या मालकीच्या वेबसाईटचे उद्घाटन केले.

Advertisements

भारतीय टेनिस क्षेत्रामध्ये ऑलिंपिक स्पर्धेत  वैयक्तिक सिंगल पदक मिळविणारा लियांडर पेस एकमेव टेनिसपटू आहे. 1996 च्या ऍटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत लियांडर पेसने प्ले ऑफ लढतीत अर्जेंटिनाच्या मेलगेनीचा पराभव करत कांस्यपदक मिळविले होते. पेसने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीमध्ये दुहेरीत 18 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या इतिहासामध्ये  लियांडर पेस हा भारताचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. त्याने या स्पर्धेत दुहेरीत 46 लढती जिंकल्या आहेत. 47 वर्षीय लियांडर पेसने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्राला आपला निरोप दिला. भारत शासनातर्फे लियांडर पेसचा यापूर्वीच खेलरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. आपल्या जवळपास तीन दशकाच्या टेनिस कारकीर्दीत सलग आठ ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले असून हा एक विक्रम आहे.

Related Stories

रविंदरला रौप्यपदक, फ्री स्टाईल प्रकारात भारताला 6 पदके

Amit Kulkarni

रणजी क्रिकेटपटूंना पन्नास टक्के भरपाई देण्याची शिफारस

Patil_p

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत मरेला वाईल्ड कार्ड

Patil_p

हॅवर्ट्झचे पुन्हा दोन गोल, लिव्हरकुसेन विजयी

Patil_p

ऑलिपिंकवीर राही साधतेय विभागीय क्रीडा संकुलात लक्ष्य

Patil_p

भारतीय मल्ल रविंदर प्लेऑफ गटात दाखल

Patil_p
error: Content is protected !!