तरुण भारत

नव्वदीतील रामराय गावकराची चित्रशाळेच्या माध्य़मातून अखंडीतपणे ‘गणेश सेवा’

92 वर्षीय अजूनही साकारताय गणेशमुर्ती

वार्ताहर/ माशेल

Advertisements

तिवरे-वरगांव, माशेल, भोम-अडकोण, बेतकी-खांडोळा परिसरातील गणपती चित्रशाळा बंद पडण्याचा सपाटा सुरू असतानाही तिवरे येथील एकमेव चित्रशाळा या परिसरात तग धरून आजपर्यंत कार्यरत आहे. 92 वर्षीच्या उतारवयातही त्याच उमेदीने रामराय गावकर आपल्या चित्रशाळेत गणपती मुर्ती साकारीत आहे. त्यांनी सद्यपरिस्थितीत सुमारे 300 मुर्ती बनविल्या आहे. सुरवातीला 20 मुर्तीपासून सुरू केलेली चित्रशाळा गावकर कुटूंबियांनी कोरोना काळातही अखंडीतपणे सुरू ठेवलेली आहे. गेल्या नव्वद वर्षाच्या काळात आपली कला जोपासताना आपल्या मुर्ती बनविण्याच्या माध्यमातून अनेक गणेशभक्तांनाही त्यांनी जोडलेले आहे.

ज्येष्ठ मुर्तीकारांशी आमच्या वार्ताहरानी भेट घेतली असता ते गणपतीच्या मुर्तीवर ब्रशने अखेरचा हात फिरवण्यात मग्न होते. सदर चित्रशाळेची 125 वर्षाची परंपरा आहे. त्यावेळी इतर अनेक चित्रशाळा कार्यरत असल्याने सर्व चित्रशाळामध्ये मुर्ती बनविल्या जात होत्या. कालांतराने आसापासच्या चित्रशाळा बंद पडू लागल्या, त्याही परिस्थितीत गावकर यांनी आपली सेवा सुरू ठेवली आहे. आपल्या पुर्वजाकडून मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात. गेल्या 60 वर्षापासून स्वत: चित्रशाळा चालवित असून सुरवातीच्या काळात बनविण्यात येत असलेल्या 20 मुर्तीही आपल्याकडूनच बनवित असल्याचे ते सांगतात.

गणेशमुर्ती चिकणमातीची केल्या जात असून पुर्वी ही चिकणमाती खांडोळय़ाहून आणली जायची, परंतू सदर मातीत दगड जास्त मिळू लागल्याने दगड व माती वेगळे करण्यात वेळ जायचा. त्याकाळी वाहनांची सोय नव्हती, बैलगाडीवरून माती आणली जायची. सद्या माती मांद्रेहून आणली जात आहे. माती बिजवण्यापासून ते गोळया बनविणे, त्यानंतर गणपतीची मुर्ती बनविण्यापासून रंगरंगोटी कामे सुरू होत असतात. काही मुर्ती साच्यातून केल्या जातात. तर काही मुर्ती पुर्णरित्या हातकामाने केल्या जातात. गणपतीची ‘रेखणी’ म्हणजे डोळे व इतर बारीक काम मुळ स्वत: करावी लागतात, त्यात इतर बंधुचे सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणतात.

चित्रशाळेत इतर कुटूंबियाचाही हातभार

आपला मोठा भाऊ विष्णू गावकर (बाप्पा) यांनी माझी गणपती बनविण्याची विद्या पदरात पाडून घेतली असून सध्या तो गणपतीच्या मुर्ती साकारण्यापासून ते रेखणीपर्यंत सर्व कामे स्वत: करीत आहे. माझ्या मुलांनीही या कामात पुर्णपणे झोकून घेतले आहे. उतरत्या वयातही आपल्याकडून जी सेवा शक्य आहे ती आपण देतो. शाळेत जवळजवळ 300 गणेशमुर्ती तयार करीत आहे. वर्षोनुवर्ष मागणी असते, परंतू माणसांचा तुटवडा भासतो व सद्या कोरोनाच्या काळात अनेक अडचणी डोके वर काढीत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण जागरूकता वाढत असल्याने हल्ली बाजारात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपती मुर्ती विक्रीस उपलब्ध असूनही परंतू लोकांचा आग्रह शाडू चिकणमातीच्या गणेशमुर्तीना पसंती दिली जात आहेत.

चित्रशाळेत तिसऱया पिढीतील विष्णू गावकर यांनी गणपती साकारण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांना आता घरातील अन्य लोक सहकार्य करीत आहे. चौथ्या पिढीतील नातू या कलेत निपूण असून वडिलांबरोबर तोही मुर्ती बनविण्याचा हातभार लावत आहे. त्याच्या वडीलाप्रमाणे तो रेखणी व रंग भरण्याचे काम अत्यंत सुरेखरित्या करतो.मुर्ती करण्याची आवड असल्याने त्यांना बारावीनंतर फाईन आर्टस शाखेत प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले.

वडीलोपार्जित मिळालेली कलेची देणगी हळूहळू आपल्या इतर कुटूंबातील सदस्यांनाही ओढ निर्माण होत आहे. कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता चित्रशाळेत भेट देणाऱयासाठी मुर्ती सामाजिक अंतर सोडून ठेवल्या असून लोकांसाठी तीन दिवस अगोदर गणपती नेण्याच्या व्यवस्थेनुसार तसा निरोपही देण्यात आला आहे.

Related Stories

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा, प्रशिक्षणाने खेळाडू व्यस्तः संजय कवळेकर

Omkar B

शैलेश नाईक विरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार

Omkar B

भाजीमाल वाहतूकीच्या बनावटगिरीतील “मास्टरमाइंड” कोण ?

Omkar B

भाजीच्या वाहनांवर मोले चेकनाक्यावर बंदी घालावी

Omkar B

कोरोना व्हायरसमुळे नव्या झुवारी पुलाचे काम रखडले

Omkar B

डोंबारी समाजाचा निष्पापपणा आणि निर्भयता सामोरे आणण्याचा निर्धार : दिग्दर्शक प्रतीक गुप्ता

Amit Kulkarni
error: Content is protected !!