तरुण भारत

हणजूण येथे रेव्ह पार्टीवर सीआयडीचा छापा

प्रतिनिधी/ पणजी

कोरोना महामारीच्या संकटातही राज्यातील किनारी भागात राजकीय वरदहस्ताने रेव्ह पाटर्य़ा सुरुच आहेत. सुस्त यंत्रणेला लोकांनी जागे केल्यानंतर या पाटर्य़ांवर तोंडदेखली कारवाई केली जात आहे. शनिवारी रात्री उशिरा वागातोर येथे अशाचप्रकारे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) कारवाई करुन 8 लाख 46 हजार रुपये किमंतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्याचबरोबर तीन विदेशी महिलांसह 23 जणांना अटक केली आहे. 

Advertisements

कोरोना महामारीच्या काळात सरकार सामान्य लोकांना वारंवार गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, वाढदिवस साजरे करु नका असे सांगत आहे. धार्मिक स्थळे बंद, प्रार्थनासभा बंद, बाजार बंद अशी परिस्थिती आहे. रस्त्यांवर वाहनचालकांना अडवून त्यांची सतावणूक करीत आहे, मात्र दारु, अंमलीपदार्थ यांच्या होणाऱया पाटर्य़ाकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकांनी आवाज उठविल्यानंतर पाटर्य़ांमध्ये सहभागी होणाऱयांवर कारवाई केली जाते मात्र आयोजकांवर कडक कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अशाप्रकारच्या तीन पाटर्य़ा उघडकीस आल्या मात्र आयोजकांवर ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सीआयडी पोलिसांनी केली कारवाई

हणजूण येथील आश्रय डेव्हलपर्सच्या फिरंगी पान्नी व्हिला नं. 7 येथे रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती. सीआयडी निरीक्षक राहूल परब, नारायण चिमुलकर व सुदीक्षा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून त्यांनी कारवाई केली. पार्टीमध्ये मोठय़ाप्रणत अमली पदार्थाचा व्यवहार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मुंबईच्या चार जणांना रंगेहात अटक

पोलिसांनी कारवाई कारवाई करून कपिल झवेरी (40 कांदिवली मुंबई), एलेना वालदीमीर एमेली आनोवा (26 मूळ मॅक्सिको, सध्या रहाणारी अंधेरी मुंबई), ऍना लिलिया नुचामेंडी (28 मूळ मॅक्सिको, सध्या रहाणारी अंधेरी मुंबई) एव्हा इब्राहिम ओवा (29 शिवोली-गोवा) या चौघांना अमली पदार्थासह रंगेहात अटक केली आहे.

नऊ लाखांच्या अंमलीपदार्थांसह रोकडही जप्त

अटक करण्यात आलेल्यांकडून 8 लाख 46 हजार रुपये किमंतीचे कोकेन 76.2 ग्राम, एमडीएमए 3.2 ग्राम, चरस 47.2 ग्राम तसेच एक्स्टीसी गोळ्या जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या कडून 2 लाख 45 हजार 500 रुपये रोख रक्कमही जप्त केली आहे. संशयितांविराधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताना आज सोमवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली

मुंबई, दिल्लीकरांसह रशियनांचा सहभाग

पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांना 188 कलमाखाली अटक करण्यात आले असून त्यामध्ये सोनिया सुरेश टोपले (27 करंजाळे), तातिया लेबेडीरेट (36 मूळ रशियन, सध्या राहणारी पर्रा बार्देश) ऍना इव्हानोल (32 मूळ रशियन सध्या शिवोली येथे राहणारी), जाने कोराफिवा (22 मूळ रशियन सध्या शिवोली येथे राहणारी), क्रिस्तेरा मातस्लेच (30 मूळ युक्रेन, सध्या राहणारी हणजूण येथे राहणारी), नमिता जैन (29 हणजूणा), नास्त्या कोरोमोनोतोक्या (27 मूळ ब्रिटन सध्या हरमल येथे राहणारी), इव्हूलीली गाल्कीव (33 मूळ रशियन सध्या नागवा बार्देश येथे राहणारी), राहूल राजेश कयात (32 राजस्थान), डिमिटंग मित्रीयाका (39 मूळ रशियन सध्या शिवोली येथे राहणारा), सुरेश रामा जोशी (29 हणजूणा), हुसेन बाबय (52 शिवोली), बिरार दिलीपभाय लात्रल (32 अंधेरी मुंबई), रॉकी सिंग (33 दिल्ली), मदीन अमर गोयल (33 मुंबई), झारक मदनसिंग यादव (21 दिल्ली), सलिम संशित खान (21 दिल्ली), अंजू यादव (21 दिल्ली) प्रासाद स्लान (24 चंदीगड) यांचा समावेश आहे.

पाटर्य़ा रोखण्यात मुख्यमंत्री अपयशी : विनोद पालयेकर

किनारपट्टी भागात रेव्ह पार्टी मोठय़ा प्रमाणात चालत असून पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना लाच देऊन या पाटर्य़ा होतात, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार व माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री प्रमोद सावंत हे या पार्टी रोखण्यास तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असून गोव्याला पूर्णवेळ स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज आहे. मंत्री मायकल लोबो हे गृहमंत्री या नात्याने चांगले काम करू शकतात, असे मत त्यांनी प्रकट केले आहे.

पाटर्य़ांवर होतेय तोंडदेखली कारवाई

काही दिवसांपूर्वी मोरजी येथे सुरु असलेली पार्टी स्थानिक लोकांनीच उधळून लावली होती. त्यापूर्वी पोलिसांनाही माहिती दिली होती मात्र नेहमी प्रमाणे सगळे काही संपल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. काही जणांना ताब्यात घेतले होते. अद्याप पार्टी आयोजित करणाऱया विरोधात कोणतीच कारवाई झालेली नसून प्रकरण गडप करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर हणजूण येथे अशाच प्रकारच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत दोन गटांमध्ये मारामारी होऊन एकटा गंभीर जखमी झाल्याने या पार्टीचे भिंग फुटले होते. याचीही माहिती लोकांनी पोलिसांना दिलीच होती. शनिवारची ही अशाचप्रकराची तिसरी पार्टी झाली. कोरोना महासंकट असताना सरकारने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून पाटर्य़ांचे आयोजन केले जात आहे. काही वेळा पोलीस कारवाईही करतात मात्र नंतर काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पोलिसांनी कारवाई करूनही पाटर्य़ा सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

गोवा विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून

Patil_p

वरूणापुरी ते मुरगाव बंदरपर्यंतचा महामार्ग गोवा मुक्तीदिनापर्यंत पूर्ण होणार- मिलिंद नाईक

Omkar B

अर्भकाच्या मृतदेहासंबंधी चौकशी करण्याची मागणी

Omkar B

‘त्या’ कंत्राटी शिक्षकांच्या वेतनात भरघोस वाढ

Amit Kulkarni

भाजपतर्फे अघोषित आणिबाणी लागू

Patil_p

गुजरात-मुंद्रा बंदरातील हेरॉईनची चौकशी करावी

Amit Kulkarni
error: Content is protected !!