तरुण भारत

जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

कोरोना योद्धय़ांचा करण्यात आला सत्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे 74 वा स्वातंत्र्ये दिन बेळगावच्या नेहरुनगर येथील जिल्हा क्रिडांगणावर शनिवारी पार पडला. जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावर्षी कोरोनामुळे सोशल डिस्टन्स राखत सध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हावासियांना संदेश देताना रमेश जारकीहोळी म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु, लालबहाद्दूर शास्त्री, डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि बाळगंगाधार टिळक यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. या स्वातंत्र्य लढय़ात बेळगावचे योगदानही विसरता येणार नाही. मागील वर्षी अतिवृष्टी व यंदा कोरोनामध्येही सरकारने मोठे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस दलाचे शानदार पथसंचलन

कर्नाटक पोलीस दलाने पथसंचलन सादर केले. बँडच्या तालावर सुंदर पद्धतीने संचलन झाले. जिल्हा पोलीस, राज्य राखीव दल, वनविभाग, अबकारी विभाग, अग्निशमन व महिला पोलिसांनी या संचलनात भाग घेतला. पथसंचलनाचे नेतृत्त्व शिवानंद देवरगी यांनी केले. यावेळी जिल्हय़ातील कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी, बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा ऐहाळे यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

ग्राहकाला काय हवे याचा नेहमी विचार करा

Patil_p

एसपीएम रोडवर वाहतुकीची कोंडी

Patil_p

निजामुद्दीन कार्यक्रमाला जिल्हय़ातूनही हजेरी

Patil_p

विठ्ठल पाटील यांना आदर्श कोविड योद्धा समाजसेवारत्न पुरस्कार

Patil_p

आशा कार्यकर्त्यांवर हल्ले केलेल्यांविरुद्ध एफआयआर

Patil_p

नववर्षाच्या मुहुर्तावर होणार मनपाच्या गाळय़ांचे लिलाव

Patil_p
error: Content is protected !!