तरुण भारत

JEE, NEET परीक्षा वेळेतच होणार : सुप्रीम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

JEE Main 2020 आणि NEET 2020 या परीक्षा यंदा वेळेतच होतील, असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. JEE Main आणि NEET परीक्षा यंदा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये या दोन्ही परीक्षा होतील. 

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर JEE Main आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळल्याने JEE Main परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. तर NEET परीक्षा 13सप्टेंबरला होणार आहे.

कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी किंवा रद्द करावी, अशी शिक्षण क्षेत्रातील अनेकांची इच्छा नव्हती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल, असे न्यायालयाला सांगितले.

Related Stories

बलात्काराच्या आरोपाखाली ‘या’ माजी मंत्र्याला अटक

Abhijeet Shinde

भारत-अमेरिका युद्धाभ्यासात कोरोनाची एंट्री

Patil_p

देशात जुलै महिन्यात 11.1 लाख कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

..त्यानंतरच हे आंदोलन संपेल : राहुल गांधी

Abhijeet Shinde

मुंबईत होळी, धुलिवंदन उत्सव साजरा करण्यास मनाई; पालिकेचा निर्णय

Rohan_P

लहान भावाने पब्जी खेळण्यास मोबाईल न दिल्याने मोठ्या भावाची आत्महत्या

Rohan_P
error: Content is protected !!