तरुण भारत

सांगलीच्या श्रेयस पुरोहितची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद

प्रतिनिधी / सांगली

पुरोहित चेस अकॅडमी, सांगली आणि बॅटल ऑफ चेस, मथुरा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये केली गेली. या स्पर्धेमध्ये जगभरातून २,४५८ खेळाडू सहभागी झाले होते. सांगलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळेयांच्यासह अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. अशी माहिती श्रेयस विवेक पुरोहित यांनी दिली.

या स्पर्धेमध्ये अज़रबैजानचा ग्रँडमास्टर रासूंलोव्ह उगार हा विजेता ठरला. त्याने १०१ गुणांसह विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राचा ग्रँडमास्टर रौनक साधवानी हा ८५ गुणांसह उपविजेता ठरला. उझबेकिस्थानचा ग्रँडमास्टर झुब्रिटस्की सिंड्रोव यास या स्पर्धेमध्ये ८१ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. रशियाचा ग्रँडमास्टर निकित मॅटिनीन यास ७७ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. रशियाचाच आंतरराष्ट्रीय मास्टर झुब्रितस्की आरत्योम यास ६९ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.

या स्पर्धेचे आयोजन नामांकित बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित आणि वरुण गेरा, मथुरा यांच्या मार्फत करण्यात आले. तांत्रिक पंच म्हणून शार्दूल तपासे आणि दीपक वायचळ यांनी काम पाहिले.

Advertisements

Related Stories

द.आफ्रिकेचा एका धावेने रोमांचक विजय

Patil_p

मेसीवर दीर्घकालीन निलंबनाची कारवाई शक्य

Patil_p

गांगुली यांची प्रकृती स्थिर

Patil_p

सांगली : राष्ट्रवादीने महागाई विरोधात पंतप्रधान मोदींना गोवऱ्या पाठवत केले आंदोलन

Abhijeet Shinde

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका: पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील आतापर्यंत १८ हजार २८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!