तरुण भारत

मंत्री राजेंद्र यड्रावकर यांची कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी यांच्यांशी चर्चा, आलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी

प्रतिनिधी / जयसिंगपूर

धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस व कोयना, चांदोली, राधानगरी या प्रमुख धरणांसह सर्व धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक रस्ते पाण्याखाली जात आहेत. सोमवारी सकाळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात नदी काठावरील गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली. नृसिंहवाडीसह शिरोळ तालुक्यातील राजापूर व तेरवाड येथील बंधाऱ्यावर प्रत्यक्ष जाऊन सद्य स्थितीची पाहणी केली. कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री नामदार श्री. रमेश जारकीहोळी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आलमट्टी धरणांमधून विसर्ग वाढवण्याबाबतची मागणी केली.

याचाच भाग म्हणून सध्या आलमट्टी धरणांमधून २.५०००० क्युसेक घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती नामदार जारकीहोळी यांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिली. सुरगोंडा पाटील, अक्षय आलासे, उदय डांगे, दिपक गायकवाड, इब्राहिम जमादार, प्रफुल्ल पाटील,सुनील चव्हाण, रविकांत कारदगे, इक्बाल बैरागदार, संजय नांदणे, विजय कोळी, साबगोंडा पाटील, प्रशांत कोळी, महेश कांबळे, प्रकाश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

मोबाईल चोरणाऱया त्रिकुटाला अटक

Amit Kulkarni

महाराष्ट्र शासनाची नेम प्लेट लावून फिरणार्‍या तोतया क्लार्कला अटक

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी घेतली शरद पवार, राज ठाकरेंची भेट

Abhijeet Shinde

निपाणीत वळीवाची सुखद बरसात

Patil_p

मुंबईत आज घुमणार मराठ्यांचा आवाज

Abhijeet Shinde

ममता वादळ थांबता थांबेना ; अल्पन बंडोपाध्याय यांची केली मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!