तरुण भारत

नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना सवलत मिळणार : राज्यमंत्री डॉ. कदम

औदुंबर येथे यांत्रिक बोटीचा लोकार्पण सोहळा: ब्रम्हनाळ दुर्घटनेतील नातेवाईकांच्या हस्ते लोकार्पण

भिलवडी : प्रतिनिधी

कोरोनामुळे राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आहे. यामुळे महापुरात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी टप्या टप्प्याने होत आहे. नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना लवकरच सवलत मिळेल असे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. ते औदुंबर ( ता.पलूस ) येथील यंत्रिक बोटींच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील . खा .संजय काका पाटील, आ. मानसिंगराव नाईक, जिल्हा अधिकारी अभिजित चौधरी, मुख्यकार्यकारी आधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा, तहसिलदार राजेंद्र पोळ, अरुण लाड, महेंद्र लाड, ए .डी. पाटील, आनंदराव भाऊ मोहिते, गिरीष गोंदील आदी उपस्थित होते.

Advertisements

यावेळी मंत्री कदम म्हणाले, २००५ च्या महापुरात स्व.पतंगराव कदम, आर.आर. आबा पाटील आणि राज्याचे जेष्ठ मंत्री जयंतराव पाटील यांची टिम सक्षम होती. यामुळे कृष्णाकाठाला व जिल्ह्याला तात्काळ मदत मिळाली. सदया सरकारमध्ये पुराच्या पाण्याचा वापर दुष्काळ भागासाठी कसा करीता येईल यासाठी वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. २०१९च्या महापुरात युवकांची व पोलिस प्रशासनाची अंगणवाडी सेविका आशा वर्कर मोठी मदत लाभली असल्याचे ते म्हणाले.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, राज्यात मंत्री कदम यांनी नव्या पिढीचे प्रभावी व उत्साही नेतत्व केले आहे. त्यांनी दिलेल्या परदेशी यंत्रीक बोटींना किमान २५ वर्षे काही होणार नाही. तसेच मंत्री कदम या मतदार संघात किमान ५० वर्षे आमदार म्हणून हालत नाही. असे चित्र दिसत आहे. आपल्या मतदार संघावर निष्ठेने व आस्मीतेने प्रेम करणारा एक सच्चा नेता असल्याचे मंत्री जयंत पाटील म्हणाले.

Related Stories

सांगली : मंदिर बंद, उघडले बार ; उद्धवा, धुंद तुझे सरकार

Abhijeet Shinde

आपल्याला लोकांच्यासाठी काहीतरी करायचे आहे म्हणुन काम करा – रुपाली चाकणकर

Abhijeet Shinde

सांगली : सोनवडे येथील एकास बलात्कार प्रकरणी जन्मठेप

Abhijeet Shinde

वसंतदादा बँकेची नोंदणी रद्द होणार

Abhijeet Shinde

भाजप पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी पडळकर, महाडिक यांची वर्णी

Abhijeet Shinde

सांगली : विषयपत्र दहा लाखांचे, ठराव सव्वादोन कोटींचा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!