तरुण भारत

कोल्हापूर : शिरढोणमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

प्रतिनिधी / शिरढोण

शिरढोण ता . शिरोळ येथील 6० वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यु झाला. याला श्वसनाचा त्रास होवू लागल्याने उपचारासाठी त्याला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरू केले दरम्यान त्याचा मत्यु झाल्याने गांवात भितीचे वातावरण पसरले.

काही दिवसापुर्वी 8० वर्षीय वृध्दाचा कोरोना मुळे मृत्यु झाल्याने गावात आता 6० वर्षीय इसमाचा दुसरा बळी गेला. गावामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गांवामध्ये एकूण रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली यामध्ये बरे झालेले 4, उपचार सुरू असलेले 7 तर मयत संख्या 2 वर पोहोचली आहे.

Related Stories

शिवाजी विद्यापीठ ए ++ मानांकन मिळणारे देशात व्दितीय

Abhijeet Shinde

इस्पुर्ली डावा कालव्याचा परिसर बनला मद्यपींचा अड्डा

Abhijeet Shinde

पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : कोल्हापुरात चक्का जाम live

Abhijeet Shinde

अंध 15 विद्यार्थ्यांना दीड लाखांची शिष्यवृत्ती प्रदान

Abhijeet Shinde

वारणा सह. दूध संघाच्या संचालिका महानंदा देशमुख यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!