तरुण भारत

प्राग्वे टेनिस स्पर्धेत हॅलेप विजेती

वृत्तसंस्था/ प्राग्वे

रूमानियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपने रविवारी येथे डब्ल्यूटीटीए टूरवरील प्राग्वे आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना तृतीय मानांकित मर्टन्सच पराभव केला. हॅलेपचे हे डब्ल्यूटीए टूरवरील 21 वे विजेतेपद आहे.

रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हॅलेपने मर्टन्सचा 6-2, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. 2020 च्या टेनिस हंगामातील हॅलेपचे दुसरे विजेतेपद आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात हॅलेपने दुबई महिलांची टेनिस स्पर्धा जिंकली होती. पायाला झालेल्या दुखापतीमुळे विंबल्डन विजेती हॅलेपची ही दुखापत विश्रांतीमुळे लवकर बरी झाली. कोरोना महामारीमुळे तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आपल्या सर्व व्यावसायिक टेनिस स्पर्धा रद्द पेंवा लांबणीवर टाकल्या होत्या. हॅलेपचे क्लेकोर्टवरील स्पर्धेतील हे आठवे जेतेपद आहे. 2018 साली तिने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धांमध्ये आतापर्यंत हॅलेप आणि मर्टन्स यांच्यात पाच सामने झाले असून त्यापैकी चार सामने हॅलेपने तर एक सामना मर्टन्सने जिंकला आहे.

Related Stories

आयपीएल स्पर्धेतील कामगिरीने ऑस्ट्रेलिया दौऱयाचे दडपण कमी : शमी

Patil_p

दिल्ली क्रिकेट संघटनेचा कारभार हंगामी समितीकडे

Patil_p

एनबीए स्टार कोबी ब्रायंटचे अपघाती निधन

Patil_p

मुंबईचा पंच; दिल्लीला धक्का देत IPL 2020 वर कब्जा

Shankar_P

राजस्थानला रोखण्याचे केकेआरसमोर आव्हान

Patil_p

टोकियो ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर

Patil_p
error: Content is protected !!