तरुण भारत

मंदिर नसेल तर लहान मंडप घालण्यास परवानगी द्या

रमेश गोरल यांचे जिल्हाधिकाऱयांना पत्र

बेळगाव :

Advertisements

 गल्लीत मंदिरच नाही अशा गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. अशा मंडळांसमोर गणेशोत्सव कसा साजरा करावा, असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना लहान मंडप उभारण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना पत्र लिहून त्यांनी मागणी केली आहे.

कोरोना काळात शासनाने नियमावलीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. ज्या गणेश मंडळांच्या परिसरात जवळपास कोणतेच मंदिर नाही किंवा सभागृह नाही, जागा अपुरी आहे, अशा गणेश मंडळांना लहान मंडप घालायला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेळगाव शहरासह तालुक्मयातील अनेक गणेश मंडळे आपल्याकडे समस्या मांडत आहेत. आपण शासनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सव साजरा करू, असे त्यांचे म्हणणे आहे. कोविड काळात शासनाची नियमावली पाळण्यास मंडळे तयार आहेत. मात्र नियमावलीतील काही जाचक अटी शिथिल कराव्यात. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे, असेही गोरल यांनी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे..

Related Stories

तालुक्मयात पहिला श्रावण सोमवार साधेपणाने

Patil_p

केएलईमध्ये मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

कापोली हायस्कूलमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Amit Kulkarni

कारने ठोकरल्याने दोन महिला ठार

Patil_p

जी.जी. चिटणीस हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni

भाग्यनगर येथे गणेशमूर्ती मिरवणूक

Patil_p
error: Content is protected !!