तरुण भारत

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर जि.प. सीईओसह ग्रामीण पाणीपूरवठा मधील लिपिक कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील लिपिकाचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मित्तल यांनी स्वतःहून सोमवारी रात्री रॅपिड टेस्ट केली होती. मंगळवारी सकाळी त्याचा अहवाल उपलब्ध झाला. मित्तल यांच्या आजोबांचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आल्यामुळे त्यांनी कोणतीही लक्षणे नसताना देखील रॅपिड टेस्ट केली. अहवालानंतर जिल्हा परिषद मुख्यालयातील सीईओंचे कार्यालय, अध्यक्षांचे दालन व अँटी चेंबरचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

सीईओसह पाणीपूरवठा मधील लिपिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तत्काळ रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना पाच दिवस गृह विलगिकरण करण्यात येणार आहे. दरम्यान कोरोनाचा वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची 19 ऑगस्ट रोजी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

सीईओ पदाधिकाऱ्यांसह अनेकांच्या संपर्कात

19 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेच्या तयारीसाठी सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत आढावा बैठक झाली आहे. अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अँटी चेंबरमध्ये पदाधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली होती. या बैठकीला सीईओ मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण समिती सभापती प्रविण यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांच्यासह काही विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आता खुद्द सीईओंचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यामुळे आता जिल्हा परिषदेत खळबळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

संपर्कातील सर्वांची होणार तपासणी

जि.प च्या विविध कामानिमित्त मित्तल यांनी गेल्या आठ ते दहा दिवसांत अनेक बैठका घेतल्या आहेत. या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन मित्तल यांनी केले आहे. त्यानुसार त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळया व्यक्तींची तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Related Stories

कणेरीवाडी फाट्याजवळ अपघात; एक ठार, एक जखमी

Abhijeet Shinde

रेल्वे स्टेशनवर आंदोलक-पोलिसांत झटापट

Abhijeet Shinde

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात

Abhijeet Shinde

हातात तलवारी,बंदुका घेत सोशलमीडियावर स्टेटस,दोघांना अटक

Abhijeet Shinde

दोन राजकीय जोडप्यासह ६ जण लॉजवरील छाप्यामध्ये ताब्यात

Abhijeet Shinde

गृहराज्यमंत्र्यांच्या चमच्यांनी जास्त उडय़ा मारू नयेत : धनंजय महाडिक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!