तरुण भारत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

Advertisements

2 ऑगस्टला शाह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. 14 ऑगस्टला ते कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर मागील 3 ते 4 दिवसांपासून पुन्हा त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागला. पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसत असल्याने शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाह सध्या ‘एम्स’चे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली आहेत.

शाह यांची प्रकृती स्थिर असून, ते रुग्णालयातून आपले कामकाज पाहणार आहेत.

Related Stories

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, पुढील 4 दिवस अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा इशारा

Rohan_P

लालबागच्या राजाचा यंदा आरोग्योत्सव!

Rohan_P

देशातील रूग्णसंख्या आता 10 दिवसांनी दुप्पट

Patil_p

दिल्ली : गेल्या 24 तासात 3,390 नवे कोरोना रुग्ण; 41 जणांचा मृत्यू

Rohan_P

सोनिया अन् राहुल गांधी यांना नोटीस

Patil_p

आंध्र-तेलंगणात तापला जल विवाद

Patil_p
error: Content is protected !!