तरुण भारत

फॉर फेस्टिव्ह लूक

सणासुदीच्या दिवसात  नटण्यामुरडण्याची संधी मिळते. छान, छान कपडे घालून, मेक अप करून मिरवता येतं. सलवार कमीझ, साडी हे प्रकार सदाबहार आहेत. ते नेहमीच फॅशनमध्ये असतात. पण थोडं हटके दिसण्यासाठी तुम्ही वेगळं काहीतरी ट्राय करू शकता.

* तुमच्याकडचा मॅक्सी ड्रेस किंवा लाँग कुर्ती जॅकेटसह कॅरी करता येईल. कुर्ता किंवा मॅक्सी ड्रेसला मॅचिंग तसंच कॉन्ट्रास्ट जॅकेट घालता येईल. ट्रेडिशनल जॅकेटमुळे तुम्हाला फेस्टिव लूक मिळेल. फ्लोअर लेंग्थ, नी लेंग्थ जॅकेट्स खूप सुंदर दिसतात. तुम्ही हटके रंग तसंच प्रिंट्सची जॅकेट्स घेऊ शकता.

Advertisements

*धोती पँट आणि त्यावर शॉर्ट कुर्ती हे सुद्धा भन्नाट कॉम्बिनेशन आहे. हा ट्रेंड सध्या इन आहे. रंगीत, ब्रोकेड, सिल्क किंवा प्रिंटेड धोती पँटवर छानशी शॉर्ट कुर्ती घालता येईल. पेप्लम स्टाईल शॉर्ट कुर्ती आणि घेरवाली धोती पँट हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसेल. यासोबत स्टेटमेंट ज्वेलरी कॅरी करता येईल. 

* साडी न नेसताही साडीचा लूक मिळवायचा असेल तर तुम्ही लेहंगा साडी ट्राय करू शकता. लाईट  ग्रीन, पीच, येलो, पिंक, ऍक्वा, ब्लू अशा ट्रेंडी रंगांच्या साडय़ा विकत घेता येतील. या साडय़ हेवी असतात. त्यामुळे हलका मेक अप करा तसंच मोजके दागिने घाला. खास प्रसंगी लेहंगा साडी खूप शोभून दिसेल.

* यंदा पलाझो सूट ट्राय करा. छानसा कुर्ता आणि पलाझो खूप मस्त दिसते. लाँग कुर्ता, पलाझोवर डिझायनर दुपट्टा घ्या. यामुळे तुम्हाला वेगळाच लूक मिळेल.

* साडीमध्ये काहीतरी वेगळं ट्राय करता येईल. लाल आणि सोनेरी कॉम्बिनेशनची साडी निवडा. हे कॉम्बिनेशन प्रत्येक वयाच्या महिलेवर शोधून दिसेल. या साडीवर लाल प्रिंटेड ब्लाउज कॅरी करा.

Related Stories

गुप्त ठेवा माहिती

Omkar B

कधी करायचं बाँडी पॉलिशिंग ?

Omkar B

मुलतानी मातीचे फेसपॅक

Omkar B

आवाज चढतोय?

Omkar B

फेशियल केल्यानंतर

Omkar B

असा घालावा मोकळा वेळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!