तरुण भारत

कोल्हापूर : युरिया खत टंचाईमुळे शेतकरी हवालदिल

प्रतिनिधी / सरवडे

शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विविध पिके व वैरणीसाठी वारंवार लागणार्‍या युरियाची सध्या ग्रामीण भागात तीव्र टंचाई भासत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे पीक व वैरण धोक्यात आली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. ही टंचाई उत्पादक व कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने निर्माण झाली आहे. असा आरोप सोळांकूर ता. राधानगरी येथील भूमाता शेती सेवा केंद्राचे मालक व वृतपत्र विक्रेते के. बी. पाटील यांनी केला आहे.

Advertisements

सध्या शेतात भात, ऊस व वैरणीवर मारण्यासाठी युरियाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी शेतकरी दररोज क्रषी केंद्राकडे युरियाची मागणी करत आहे. मात्र कृषी सेवा केंद्रचालक ज्या मुख्य वितरकाकडून युरिया खरेदी करतात. त्यांच्याकडून युरियाबरोबर न खपणारे इतर खत घेण्याची सक्ती केली जाते. याबाबत क्रषी अधिकार्यांकडे तक्रार केल्यास दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे युरियाअभावी हातातोंडाशी आलेले पीक बळीराजाला गमावण्याची वेळ आली आहे. अगोदरच अनेक संकटाच्या द्रष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना क्रषी खात्याने त्वरित युरिया उपलब्ध करून द्यावा.व पिक वाचवावे अशी मागणी समस्त शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Related Stories

सातनदुधनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे चोरांचा डाव फसला

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्णसंख्या २ हजारांच्या आत, आज ७ मृत्यू

Abhijeet Shinde

चिंचवाड येथील एकाचा कृष्णेत बुडून मृत्यू

Abhijeet Shinde

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी वाचनालय सुरू करा : मंत्री सतेज पाटील यांना निवेदन

Abhijeet Shinde

कणेरीत गवारेड्यांचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट!

Abhijeet Shinde

गोकुळसह जिल्हा बँक, `राजाराम’ची रणधुमाळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!