तरुण भारत

ऑगस्टच्या 15 दिवसात वीज उत्पादनात वाढ

पश्चिमेकडील राज्यात महाराष्ट्र, गुजरातकडून विक्री वाढली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

मार्च महिन्याच्या प्रारंभीच्या 15 दिवसांच्या कालावधीनंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात देशातील वीज उत्पादन मागील वर्षाच्या समान कालावधीत 2.6 टक्क्मयांनी वधारले तर जुलैमध्ये हाच आकडा 1.8 टक्क्मयांनी घटला होता,  अशी माहिती केंद्रीय ग्रीड संचालक पोसोको के डेली लोड डिस्पॅच डाटा विश्लेषक यांनी दिली आहे.

जुलै महिन्याच्या अखेरच्या पंधरा दिवसात मात्र वीज उत्पादन 3.1 टक्मक्मयांनी घसरले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार उत्तरेकडील मुख्य राज्यांमधील मागणीचा दर अधिक राहिला आहे आणि उद्योग असणाऱया पश्चिमेकडील राज्यात महाराष्ट्र, गुजरात यांच्याकडून विक्री वाढल्याने देशातील वीज उत्पादन वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्राचा वेग मंदावला आहे. मागील पाच महिन्यात वीज उत्पादनात सलगची घसरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण देशातील संपूर्ण वर्षात जितकी वीज विक्री केली जाते. त्याच्या निम्मी विक्री ही उद्योगधंदे आणि कार्यालयांना होत असल्याचे म्हटले आहे.

नैसर्गिक वीज उत्पादनांतील वाढ

ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवडय़ात अक्षय वीज उत्पादन 2.3 टक्क्मयांनी वाढले आहे. यामध्ये जुलैच्या तुलनेत 20 टक्क्मयांची घसरण झाली आहे. सौर ऊर्जा उत्पादन 19.3 टक्क्मयांनी वाढले, पवन ऊर्जा उत्पादन याच दरम्यान 10 टक्क्मयांनी घटलेले आहे. तसेच दुसऱया बाजूला कोळसा वीज उत्पादन हे 4.2 टक्क्मयांनी वधारले आहे. कारण देशातील कोळसा हा सर्वात मोठा वीज निर्मितीचा स्रोत राहिलेला आहे. राज्याच्या तुलनेत राज्यस्थानात सर्वाधिक म्हणजे 15.7 टक्क्मयांची वीज विक्री झाल्याची नोंद केली आहे.

Related Stories

डिजिटल पेमेन्टसाठी स्मार्टफोन आवश्यक नाही?

Patil_p

निर्यातीचे दस्ताऐवज ऑनलाईन

Patil_p

अदानी पोर्टस्चा नफा 285 टक्के वाढला

Patil_p

मे महिन्यात वाहनांची रिटेल विक्री 55 टक्क्यांनी कमीच

Patil_p

सोलार निर्मितीत 15 कंपन्या गुंतवणुकीच्या तयारीत

Patil_p

टॅव्हल, पर्यटन-विमान उद्योगातील रोजगार धोक्यात?

Patil_p
error: Content is protected !!