तरुण भारत

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

नवी दिल्ली

 रियलमीने आपले दोन नवे स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. सी 15, सी 12 या स्मार्टफोन्सचा पहिला सेल 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कंपनीने वरील दोन स्मार्टफोन्सचे सादरीकरण व्हर्च्युअल पातळीवर मंगळवारी केले. सी 15 हा 6.5 इंचाच्या मिनी ड्रॉप फुलस्क्रीन डिस्प्लेसह येणार आहे. याला 6 हजार एमएएच बॅटरीची अप्रतिम शक्तीची जोड असून 18 डब्ल्यू क्वीक चार्जची सोय आहे. मीडिया टेक हेलीओ जी 35 12 एनएम ओका कोअर 64 बिट प्रोसेसरची या फोनला सोय असणार असून 13 एमपी एआय क्वाड कॅमेराही याला असेल. अल्ट्रावाइड बी अँड डब्ल्यू तसेच रेट्रो लेन्सच्या या फोनला 8 एमपी सेल्फी कॅमेरा असणार असून पॉवर सिल्वर आणि पॉवर ब्ल्यू या दोन रंगात तो उपलब्ध होणार आहे. 3 अधिक 32 जीबीच्या मेमरी फोनची किंमत 9 हजार 999 रुपये तर 4 अधिक 64 जीबीची किंमत 10 हजार 999 रुपये असणार आहे. पहिला सेल 27 ऑगस्टच्या रात्री 12 नंतर सुरू होईल. रियलमीडॉटकॉम आणि फ्लीपकार्ट यावर तो खरेदी करता येईल. सी 12 हा साडेसहा इंचाच्या स्क्रीन डिस्प्लेसह येणारा फोन 6 हजार एमएएच बॅटरीचा असेल. फिंगरप्रिंट सेन्सरसह येणाऱया या फोनला मीडियाटेक हेलिओ जी 35 प्रोसेसर असेल. 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेजसह 13 एमपी एआय ट्रिपल कॅमेऱयासह येणाऱया या फोनला 5 एमपी प्रंट कॅमेरा आहे. या फोनची किंमत 8 हजार 999 रुपये असणार असून 24 ऑगस्टपासून रात्री 12 नंतर पहिला सेल रियलमी डॉट कॉम व फ्लिपकार्टवर असेल.

Related Stories

गुगलचा अफोर्डेबल फोन पिक्सल 4 ए सादर

Patil_p

सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांना लवकरच अच्छे दिन

Patil_p

सॅमसंग गॅलेक्सी एम 11 चे सादरीकरण

tarunbharat

पोकोचा ‘एक्स 3 प्रो’दमदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात

Patil_p

7 जानेवारीला गॅलक्सी एम 02 बाजारात

Patil_p

मोटोरोलाचा इ 7 स्मार्टफोन सादर

Omkar B
error: Content is protected !!