तरुण भारत

धोनीच्या षटकाराकरिता होणार ‘त्या’ खुर्चीचा सन्मान!

2011 विश्वचषक फायनलमधील षटकाराच्या आठवणींना उजाळा, एमसीएला अजिंक्य नाईक यांचा प्रस्ताव

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

धोनीने लंकन गोलंदाज कुलसेकराला षटकार खेचत 2011 चा वनडे विश्वचषक जिंकून दिला, त्याच्या आठवणी रसिक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही तितक्याच ताज्या आहेत. प्रत्यक्ष स्टेडियमवर देखील त्या आठवणीला उजाळा मिळत रहावा, यासाठी धोनीने षटकार फटकावल्यानंतर तो चेंडू ज्या खुर्चीवर येऊन आदळला, त्या खुर्चीला वेगळा रंग देण्याचा प्रस्ताव मुंबई क्रिकेट कार्यकारिणीचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी दिला आहे. नाईक यांनी याबाबत मुंबई क्रिकेट संघटनेला रितसर प्रस्ताव पाठवला आहे.

महेंद्रसिंग धोनी अलीकडेच 15 ऑगस्ट रोजी निवृत्त झाला. त्यानंतर अजिंक्य नाईक यांनी मुंबई क्रिकेट संघटनेकडे ही सूचना पाठवली. वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट म्युझियम उभारावे, असाही कार्यकारिणीचा प्रस्ताव असून त्यावर लवकरच चर्चा होणे अपेक्षित आहे.

किवी, ऑस्ट्रेलियाची परंपरा

न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियामध्ये एखाद्या खेळाडूच्या सन्मानार्थ स्टेडियममधील खुर्चीला त्याचे नाव देण्याची जुनी परंपरा आहे. भारतात मात्र एखाद्या खेळाडूचा असा सन्मान केला जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. ऑकलंडमधील ईडन पार्क स्टेडियमवर ग्रँट इलियॉटने 2015 विश्वचषक उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्तूंग षटकार खेचला होता. तो चेंडू ज्या खुर्चीवर येऊन आदळला, त्याला हिरवा रंग देण्यात आला असून ती खुर्चीही इलियॉटच्या नावाने ओळखली जाते. त्यापासून प्रेरणा घेत आपण धोनीच्या त्या षटकाराचा सन्मान करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे अजिंक्य नाईक यांनी नमूद केले.

‘वानखेडे स्टेडियमला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतीय क्रिकेटसाठी या स्टेडियमने अनेक रोमांचक क्षण अनुभवाला दिले आहेत. त्या इतिहासाचा गौरव करण्याकरिता वानखेडे स्टेडियमवर म्युझियम उभे करावे आणि भविष्यात स्टेडियम टूर आयोजित करावी, असा आमचा प्रस्ताव आहे’, असे अजिंक्य नाईक याप्रसंगी म्हणाले.

नाईक यांचा प्रस्ताव मुंबई क्रिकेट संघटनेने स्वीकारला तर सुनील गावसकर स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, विजय मर्चंट स्टँड, पॉली उम्रीगर स्टँड व विनू मंकड गेट आदी मांदियाळीत एमएस धोनी सीटचा देखील आवर्जून समावेश होऊ शकतो, याचे हे संकेत आहेत.

Related Stories

माजी हॉकीपटू अशोक दिवाण लवकरच मायदेशी परतणार

Patil_p

एएफसीच्या कोरोना व्हायरस मोहिमेत भुतियाचा समावेश

tarunbharat

माजी टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे कोरोनाने निधन

Patil_p

दुखापतीमुळे मनीष पांडे मुस्ताक अली स्पर्धेतून बाहेर

Patil_p

महान धावपटू मिल्खा सिंग कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावात खुर्दा

Patil_p
error: Content is protected !!