तरुण भारत

मालीमध्ये सैनिकांचे सरकारविरोधी बंड; पंतप्रधानांसह राष्ट्रपतींना घेतले ताब्यात

ऑनलाईन टीम / बामाको :

पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात लष्कराने सरकारविरोधी बंड पुकारले आहे. मालीची राजधानी बामाकोजवळ बंडखोर सैन्याने हवेत गोळीबार केला. तसेच पंतप्रधान बोबू सिसे आणि राष्ट्रपती इब्राहिम बुबाकार यांच्या निवासस्थानाला घेराव घालत त्यांना बंदूकीचा धाक दाखवून शरण येण्यास सांगितले. तेथील सैन्याने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना ताब्यात घेतले आहे. 

Advertisements

बामाकोजवळ मंगळवारी एका लष्करी तळावर सैनिकांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. त्यावरून हा संघर्ष सुरु झाला. राष्ट्रपती इब्राहिम बुबाकार यांच्याविरोधात अनेकदा निदर्शने झाली आहेत. त्यांनी पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी विरोधक करत आहेत. मालीमधील परिस्थिती हिंसक झाली आहे.

मालीमध्ये अशांततेची सुरुवात लष्कराचे केंद्र असलेल्या काटी शहरापासून झाली. लष्करी तळावरील नाराज कनिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक कमांडर्सला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी या लष्करी तळावर ताबा मिळवला. तेव्हा देशात अनेक ठिकाणी तरुणांनी जाळपोळ केली.

आफ्रीकन राष्ट्रांच्या गटाने आणि स्थानिक ग्रुप इकोवासने या बंडाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बंड पुकारणाऱ्या सैनिकांनी राष्ट्रपतींना ताब्यात घेत राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रपती इब्राहिम बुबाकार यांनी राजीनामाही दिला आहे. तरी देखील या सैनिकांनी सरकारबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 65 लाखांचा टप्पा

datta jadhav

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

Abhijeet Shinde

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

Abhijeet Shinde

छोटा राजनची कोरोनावर मात; एम्समधून पुन्हा तिहारमध्ये रवानगी

datta jadhav

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचं निधन

Abhijeet Shinde

पेठनाका येथे कोकेन तस्कर नायजेरियन तरूण जेरबंद

Sumit Tambekar
error: Content is protected !!