तरुण भारत

मोले भागातील प्रस्तावित मोठे प्रकल्पामुळे गोव्याचे अस्तित्व धोक्यात

इतिहासतज्ञ तथा पर्यावरणप्रेमी प्रा. प्रजल साखरदांडे यांचे प्रतिपादन : प्रोगेसीव्ह प्रंट ऑफ गोवा तर्फे आयोजित पत्रकार परीषदेत मोले गावातील लोकांनी व्यक्त केली खरी परीस्थिती

प्रतिनिधी / पणजी

मोले येथील भगवान महावीर अभयारण्यात प्रस्तावित तीन मोठे प्रकल्प येणार असून यामुळे जैवविविधतेने समृध्द असलेल्या भागाचे अस्तित्व तथा गोव्याचा नैसर्गिक वारसा  नष्ट होणाच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने ‘सेव्ह मोले अभियान’ गोव्याचे अस्तित्व टिकविण्यासाठीचे मोठे अभियान असणार आहे. असे इतिहासतज्ञ व पर्यावरणप्रेमी प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.

मंगळवारी प्रोग्रेसिव्ह प्रंट ऑफ गोवातर्फे पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत प्रा. प्रजल साखरदांडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रोग्रेसिव्ह प्रंटचे महेश म्हांबरे, रितेश शणैयी, गोंयचो एकवटचे उपाध्यक्ष ज्युलियो आगियार,, अभियंता कृष्णा झोरे, सुशांत तेंडूलकर, गजानन सावईकर, गितेश झोरे व इतर उपस्थित होते.

 मोले अभयारण्य नष्ट झाल्याने म्हादई प्रमाणे गोव्यावर व गोमंतकीयावर याचा मोठा वाईट परीमाण होणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण भाग जपणे फार गरजेचे आहे. यासाठी सदर प्रस्तावित तीन मोठे प्रकल्प रोखणे गरजेचे आहे. यासाठी सर्व गोमंतकीयांनी पुढे यायला पाहीजे. असे आवाहन साखरदांडे यांनी यावेळी केले.

दुधसागर धबधबा हा पर्यटनदृष्टय़ा महत्वाचे ठिकाण आहे. येथे दरवर्षी सुमारे लाखो लोक भेट देत असतात. कूळे, व मोले भागातील सुमारे हजारपेक्षा अधिक स्थानिक कुटूंबिय या पर्यटणावर अवलंबून आहे. परंतु या प्रकल्पांमुळे दुधसागर धबधबाच नष्ट होणाच्या मार्गावर आहे. तसेच लाखो स्थानिकांचा व्यवसायही ठप्प होणार आहे. असे दुधसागर टूअर ऑपरेटरचे माजी अध्यक्ष ट्रिबोलो सोझा यांनी यावेळी सांगितले.

सरकारने या प्रकल्पाला मान्यता देताना या भागाचा अभ्यास केला नाही. या प्रकल्पांसाठी शेकडो झाडे कापण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथे कोळसा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याचा भयंकर परीमाण स्थानिकांना सहन करावा लागणार आहे. असे ज्युलियो आगियार यांनी यावेळी सांगितले.

आम्ही स्थानिक असून आम्हाला या प्रकल्पासंदर्भात आम्हाला काहीच कळविण्यात आले नाही. मे महिन्यामध्ये काही अधिकाऱयांनी माझ्या भाटाला भेट देऊन भाटातील झाडांवर काही क्रमांक लिहून गेले, तेव्हा आम्हाला या संदर्भात काहीच कळाले नाही, परंतु नंतर काही दिवसांनी आम्हाला कळविण्यात आले की आमची जमीन या प्रकल्पाला जाणार आहे. आता सरकारले वाटते की स्थानिक उगाचच या प्रकल्पाला विरोध करत आहे. परंतु सरकारतर्फे कुणीही याविषयी स्थानिकांना भेटायला आला नाही. त्यामुळे सरकारने या प्रकल्पाला विरोध करणाऱयांशी चर्चा करुनच निर्णय घ्यावा. असे ज्यांच्या भाटातून हा प्रकल्प जात आहे असे सुशांत तेंडूलकर यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत स्थानिकांना विश्वासात न घेताच दोन हजारपेक्षा जास्त झाडे पॉवर ट्रान्समिशन लाईन या प्रकल्पासाठी कापण्यात आली आहे. कर्नाटकने या प्रकल्पासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही तरी देखील गोवा सरकारने घाईघडबीत झाडे कापून भूमी पूजन करण्यात आहे. या प्रकल्पाची सुरुवात छत्तीसगढपासून होऊन कर्नाटकच्या मार्गाने गोव्यात येणार आहे. असे अभियंता कृष्णा झोरे यांनी सांगितले.

राज्य सरकारने सेसा गोवाची खाण वाचविण्यासाठी सदर प्रकल्प लोकांच्या भाटा शेतातून वळविले आहे. मोठय़ा लोकांना वाचविण्यासाठी लहान-दुबळय़ा लोकांचा बळी घेत आहे. मुख्यमंत्री सांगतात की मोले येथील लोकांना काहीच हरकत नाही आहे. परंतु मुख्यमंत्री किंवा पर्यावरणमंत्री यांनी किती वेळा या भागाला भेट देऊन लोकांशी यासंदर्भात चर्चा केली हे स्पष्ट करावे. काही दिवसापूर्वी पणजीचे माजी आमदारने पत्रकार परीषद घेऊन काहीजण उगाच विरोध करत असल्याचे सांगितले. तसेच या भागाला आम्ही भेट दिल्याचे सांगितले. परंतु भाजपमध्ये या प्रकल्पासंदर्भात अनेक जणांना काहीच माहीत नसल्याचे दिसून येते. उगाच पक्ष सांगत आहे म्हणून पत्रकार परीषद घेऊन लोकांची दिशाभूल करत आहे. तसेच बहुतेक येथे मोठे प्रकल्प होत असल्याने येथील जागांना भाव मिळणार असल्याने काही जागा विकत घेण्यासाठी फिरत असणार असा आरोप प्रोग्रेसिव्ह पंट ऑफ गोवाचे महेश म्हांबरे यांनी केला. तसेच कुठलेही वक्तव्य करताना जबाबदारीने वक्तव्य करावे. असा सल्ला म्हांबरे यांनी यावेळी दिला.

Related Stories

मुंबईचा ओडिशावर विजय, बिपीन सिंगची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni

मडगाव व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूमुळे तणाव

Patil_p

महिलांच्या आयुष्यात डोकावणारा ‘मॉरल ऑर्डर’

Shankar_P

तळपण येथील समुद्राच्या पाण्याचा रंग बनला हिरवा

Patil_p

आठ दिवसात तिसरे कोविड हॉस्पिटल कार्यरत होणार : आरोग्यमंत्री

Patil_p

वास्कोत वाऱया पावसामुळे पडझड, घरांमध्येही शिरले पाणी

Omkar B
error: Content is protected !!