तरुण भारत

रिलायन्सकडून औषध कंपनी नेटमेड्स खरेदी

सदरचा व्यवहार 620 कोटीना : कंपनीची देशात 20 हजार ठिकाणी सेवा

नवी दिल्ली

Advertisements

 देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ऑनलाइन औषध विक्रीत कार्यरत असणारी कंपनी नेटमेड्सची खरेदी केली आहे. रिटेल व्यवसायात हा सर्वात मोठा क्यवहार करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली आहे. कारण रिलायन्सची सहाय्यक रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने डिजिटल फार्मा मार्केट प्लेस नेटमेड्सची मोठय़ा संख्येने समभाग विक्री करुन सदरचे अधिग्रहण केले आहे.

रिलायन्सकडून ऑनलाईन औषध विक्री करणारी नेटमेड्स कंपनीमध्ये 620 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. रिलायन्सने विटालिक हेल्थ आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांमध्ये जवळपास 60 टक्क्मयांची हिस्सेदारी घेतलेली आहे. रिलायन्सने सहयोगी कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केट प्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्रायव्हेट लिमिटेडमधील 100 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. 

ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनने ऑनलाईन फार्मसी व्यवहारात प्रवेश करण्याची घेषणा केली आहे. यामध्ये अनेक फार्मा स्टार्टअपसोबत चर्चा सुरु असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामुळे येत्या काळात यामध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

नेटमेड्स कंपनी काय आहे

नेटमेड्स एक ई फार्मा पोर्टल आहे. ज्याच्या आधारे प्रिस्क्रिप्शन आधारित आणि ओव्हर द काउंटर औwषध आणि अन्य आरोग्याची उत्पादने विक्री केली जात आहेत. ही सेवा देशातील जवळपास 20,000 ठिकाणी उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त कंपनी औषधाची घर ते घर डिलिव्हरी करीत आहे. याची प्रमोटर चेन्नई आधारित कंपनी दाधा फार्मा आहे. ही 2015 पासून काम करत आली आहे.

Related Stories

देशात आजही रोजगाराचे संकट?

Patil_p

टेस्लाचे एलॉन मस्क बनले जगातील धनाढय़

Patil_p

हुआईची क्लाउड कंटेंट नेटवर्क सेवा भारतात

Patil_p

एमएम फोर्जिंग्सकडून कॅफोमाचे अधिग्रहण

Patil_p

गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडकडे

Patil_p

फ्लिपकार्टकडून वॉलमार्ट इंडिया होलसेलचे अधिग्रहण

Patil_p
error: Content is protected !!