तरुण भारत

एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून शगुन गिफ्ट इन पॉलिसी सादर

भारतीय संस्कृतीवर पॉलिसीची रचना : नातेवाईकांना भेट देता येणार

नवी दिल्ली

Advertisements

 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जनरल इन्शुरन्सकडून वैयक्तिक अपघात पॉलिसी शगुन गिफ्ट इन इन्शुरन्सचे सादरीकरण केले आहे. यांचे मुख्य वैशिष्टय़े म्हणजे ही पॉलिसी कोणालाही भेट म्हणून देता येण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. यामध्ये कोणतेही नातेवाईक किंवा अन्य कोणालाही ही सेवा देता येणार असल्याचे एसबीआय इन्शुरन्सने स्पष्ट केले आहे. 

सदर योजनेच्या अंतर्गत पॉलिसी प्रीमियम 501, 1001 आणि 2001 रुपये ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे. यात कोणालाही भेट म्हणून पॉलिसी देता येणार असून कोणतीही परीक्षा पास झालेल्यांना, नवीन कार खरेदी, नवीन घर, जन्मदिन, लग्न,
नवी दुचाकी खरेदी किंवा कॉलेज प्रवेश आदीसाठी ही योजना भेट स्वरुपात देता येणार आहे.

शगुन एसबीआय जनरलची वेगळीच पॉलिसी आहे. यात भारतीय संस्कृतीमधील विशेष पैलूचा समावेश केला आहे. सण समारंभासह अन्य दिवसाचे महत्व लक्षात घेत ही पॉलिसी सादर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण एसबीआय इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ पीसी कांडपाल यांनी केले आहे.

वैयक्तिक अपघात विमा

वैयक्तिक अपघात झाल्यास त्याला संरक्षण म्हणून विमा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामध्ये शगुन इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यात अपघातामध्ये मृत्यू आणि काही प्रमाणात अपंगत्व आल्यास त्यांना वित्तीय सुरक्षा देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच वाहन किंवा घराचे नुकसान झाल्यावर विमा रक्कमेचा 1 टक्का म्हणजे 25 हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. याच्यासाठी वयोमर्यादा 18 च्या वर ते 65 वर्षापर्यंत असणे बंधनकारक आहे.

Related Stories

ऍमेझॉन इंडियाकडून रोजगार निर्मिती

Patil_p

करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून परतावा

Patil_p

अखेर सेन्सेक्सची 646 अंकांची उसळी

Patil_p

एडीक्युची बायजूमध्ये गुंतवणूक

Patil_p

ओएनजीसीची इंडियन गॅसमध्ये हिस्सेदारी

Amit Kulkarni

किरकोळ वाढीसह दोन्ही निर्देशांक बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!