तरुण भारत

सचिन पहिल्या मारुती 800 कारच्या शोधात!

मुंबई

 मारुती 800 ही माझी पहिली कार होती. दुर्दैवाने ती कार आता माझ्याकडे नाही. ती कार परत मिळत असल्यास मला निश्चितच आनंद होईल. ही पोस्ट जे वाचत आहेत, त्या सर्वांना माझी अशी विनंती आहे की, माझ्या त्या पहिल्या कारच्या ठावठिकाण्याची कल्पना असेल तर माझ्याशी थेट संपर्क साधा, हे आवाहन आहे विश्वविक्रमवीर माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचे!

Advertisements

मुदित दानीच्या ‘ईन द स्पोर्टलाईट’ या खास एपिसोडमध्ये सचिन यावेळी बोलत होता. आपल्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा देताना आपल्या मारुती 800 या कारबद्दल बोलताना सचिन भावूक झाला आणि त्याने ही कार शोधण्यासाठी आपली मदत करावी, असे आवाहन केले.

मास्टरब्लास्टर सचिनने 200 कसोटी सामन्यात 53.8 च्या सरासरीने 15921 धावा केल्या. याशिवाय वनडेत 463 सामन्यात 44.8 च्या सरासरीने 18426 धावांचे योगदान त्याने दिले. आपल्या कारकिर्दीत त्याने एक टी-20 सामनाही खेळला.

Related Stories

फुटबॉल सम्राट पेलेच्या विश्वविक्रमाशी छेत्रीची बरोबरी

Patil_p

कार्लसन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Patil_p

साई केंद्रातील नव्या सुविधांना क्रीडापटूंची नावे देणार

Patil_p

विंडीज निवड समिती सदस्यपदी सरवान

Patil_p

आयपीएलमध्ये खेळताना वर्णद्वेषी शेरेबाजी झाली होती : सॅमी

Patil_p

दिल्ली-केकेआर ‘व्हर्च्युअल सेमी फायनल’ आज

Patil_p
error: Content is protected !!