तरुण भारत

विनेश फोगटची शिबिरातून माघार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची एकमेव महिला मल्ल विनेश फोगटने कोरोना महामारीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रीय शिबिरातून माघार घेतली आहे. तिच्या या निर्णयावर राष्ट्रीय कुस्ती फेडरेशनने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisements

ऑलिम्पिक वजनगटासाठी राष्ट्रीय शिबिराचे पुनर्नियोजन करण्यात आले असून महिलांसाठी लखनौमध्ये तर पुरुषांसाठी सोनपत येथे 1 सप्टेंबरपासून त्याची सुरुवात होणार आहे. मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे विनेशने लखनौला जाण्यास नकार दिला आहे.

‘मी शिबिरात दाखल होणार नाही. वैयक्तिक प्रशिक्षक वोलर ऍकोस दर आठवडय़ास सरावाची योजना पाठवितात. त्यानुसार प्रशिक्षक ओम प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव करीत आहे. लखनौला प्रवास करून जाण्याइतकी स्थिती नाही, हे लक्षात आल्याने मी हा निर्णय घेतला,’ असे विनेशने स्पष्ट केले.

विनेशने जी कारणे दिली आहेत, त्यावर राष्ट्रीय फेडरेशन मात्र समाधानी नाही. ‘विनेशला सवलत द्यायची का, याचा निर्णय निवड समिती घेईल. शिबिर आमच्या फायद्यासाठी ठेवण्यात आलेले नाही. खेळाडूंनेच अशी भीती व्यक्त करावी, याचे आश्चर्य वाटते. ती कोणत्या आखाडय़ात ट्रेनिंग घेत आहे आणि तेथे कोणत्या सुविधा आहेत, याची आम्हाला काहीही माहिती नाही,’ अशी तीव्र प्रतिक्रिया डब्ल्यूएफआयचे सहसचिव विनोद तोमर यांनी व्यक्त केली.

Related Stories

गंभीरची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Patil_p

टी-20 वर्ल्ड कपसाठी 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी

Patil_p

इटालियन ब्रिगेड ठरले युरो चॅम्पियन्स!

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या मदतीला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर

prashant_c

महिला विश्वचषक पात्र फेरी सामने झिंबाब्वेत

Amit Kulkarni

निर्विवाद आघाडी हाच एकमेव निर्धार

Patil_p
error: Content is protected !!