तरुण भारत

धोका वाढला : दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाख पार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. मागील 24 तासात दिल्लीत 1398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 139 वर पोहचली आहे. यामधील 11 हजार 137 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी 1320 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 40 हजार 767 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4235 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 13 लाख 58 हजार 189 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 6317 आरटीपीसीआर टेस्ट आणि 14,498 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

हत्येच्या आरोपात हत्तिण अन् तिच्या पिल्लाला पकडले

Patil_p

टोळधाड : पुढील चार आठवडे भारताला अतिदक्षतेचा इशारा

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार 11 बळी

Patil_p

राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरेंकडे केली ‘ही’ मागणी

Abhijeet Shinde

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी वकील प्रशांत भूषण दोषी

Rohan_P

माझे इंग्रजी उत्तम नाही!

Patil_p
error: Content is protected !!