तरुण भारत

कोल्हापूर : शिरोळ पंचायत समिती माजी उपसभापती मानसिंग खोत यांचे निधन

प्रतिनिधी / कुरुंदवाड

शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि घोसरवाडच्या विविध संस्थांचे संस्थापक मानसिंग शंकरराव खोत ( वय 58) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. मानसिंग खोत हे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक व खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत घोसरवाड मध्ये विविध विकासकामे करून गावाचा विकास साधला होता . या माध्यमातून त्यांनी घोसरवाड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध संस्था निर्माण केल्या होत्या.
मानसिंग खोत यांनी आपल्या उपसभापती पदाच्या कारकिर्दीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला होता. नृसिंहवाडी येथील साळुंखे महाराज यांच्या अन्नछत्र ट्रस्टचे संचालक म्हणून तसेच त्या विभागात ते गेल्या अनेक वर्षापासून सेवेकरी म्हणून कार्यरत होते. मानसिंग खोत यांच्या निधनाने राजकारण समाजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे

Related Stories

विद्यापीठात आता ‘इको पेंडली स्मार्ट नॅनो फायबर’

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जिल्हा परिषद उपाध्यक्षांना कोरोनाची लागण, 31 नवे पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

साडेनऊ लाख ग्राहकांची वीज बिल भरण्याकडे पाठ ,

Abhijeet Shinde

कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीत जुगार अड्यावर छापा; बारा जणांना अटक

Abhijeet Shinde

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी अर्जुनवाड्यातच साजरे केले रक्षाबंधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!