तरुण भारत

सिंड्रोम एक्स म्हनजे काय ?

हृदयरोगाला कारणीभूत ठरणार्या काही धोकादायक गोष्टी असतात. यात मधुमेह, पोटाभोवती चरबी जमणे, कोलेस्टेरॉल वाढणे, उच्च रक्तदाब या महत्त्वाच्या आहेत.

विशेषतः मधुमेह जर इन्सुलिनला प्रतिसाद देणारा नसला तर या लक्षणांच्या समूहाला सिन्ड्रोम एक्स म्हणतात.

Advertisements

शरीरात चरबी किती वाढली, याहीपेक्षा ती कुठे साचली, हे महत्त्वाचे आहे. चरबी पोटाभोवती वाढणे जास्त धोकादायक असते.

निदान : यासाठी कमरेचा घेर, नितंबाचा घेर, रक्तदाब मोजावा लागतो.

याशिवाय रक्तातील साखर आणि लिपिड प्रोफाईल (कोलेस्ट्रेरॉल- चांगले-वाईट टायग्लिसईड) तपासावे लागते. यात चांगले केलेस्टेरॉल कमी होते, ट्रायग्लिसराईड वाढतात.

शरीरातील चरबीच्या पेशी नीट कार्य करीत नाहीत, त्यामुळे इन्सुलिनच्या कार्याला अडथळा येतो. चरबीच्या पेशींचा आकार वाढतो. त्यांच्या भोवती इतर पेशीपण जमा होतात. त्यामुळे ‘सायटोकाईन’ नावाचे पेशींना इजा करणारे पदार्थ तयार होतात.

या स्थितीत रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढते, तसेच रक्तवाहिन्यांचा आतील थराला इजा होते. त्यामुळे हृदयाला इजा होण्याची शक्यता वाढते. आहारावर योग्य नियंत्रण केले पाहिजे.

नियमितपणे चालण्यासारखा
व्यायाम केला पाहिजे. मधुमेह असल्यास इन्सुलिनव्यतिरिक्त
मेटफॉर्मिन औषध उपयोगी ठरते. अशांनी चुकूनसुद्धा तंबाखूचे सेवन करू नये.

तसेच रक्तदाब 120/80 च्या आतच ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Related Stories

कोरोनाचा ‘दुसरा हल्ला’

Omkar B

कॅफिन आणि आरोग्य

Amit Kulkarni

राज्यात आरोग्य विभागाची मेगाभरती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

triratna

लक्षण दिसत नसल्यामुळे

Amit Kulkarni

भ्रूणाच्या नाळेत ‘मायक्रोप्लास्टिक’

Omkar B

जपावे दंत आरोग्य

Omkar B
error: Content is protected !!