तरुण भारत

जीएसटी परिषद 27 ऑगस्ट रोजी होण्याचे संकेत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

कोरोनाच्या महामारीत लाखो युवकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. परंतु, अशा कठीण काळातही नवीन आशा पल्लवीत करण्यासाठी गुगल कंपनीने ‘कोरमो जॉब्स’ नावाचे ऍप विकसित केले आहे. सदर ऍपच्या मदतीने युवकांना आपल्या पसंतीची नोकरी शोधण्यास मदत होणार आहे. सदर ऍपच्या अंतर्गत गुगलकडून सदरच्या अँड्रॉईड ऍपवर संपूर्ण देशभरातील नोकऱयांसंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे.

Advertisements

गुगलने मागील वर्षात आपल्या पेमेंट ऍप गुगल पे सोबत भारतामध्ये जॉब फिचर सुरू केले होते. या फिचरच्या मदतीने सद्यस्थितीमधील मागणीवर आधारित व्यवसाय, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी उपलब्ध अशा रोजगाराची माहिती उपलब्ध करून दिली होती.

20 लाखापेक्षा अधिक रोजगार

झोमॅटो, डूंजो यासारख्या कंपन्यांच्या मागणीनुसार कौशल्यप्राप्त केलेल्या अनुभवी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचीच दखल घेत जवळपास 20 लाखापेक्षा अधिकचे रोजगार सदरच्या ऍपवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती रसेल यांच्या एका ब्लॉगपोस्टमधून सांगण्यात आले आहे.

गुगलच्या जॉब फिचरला 2018 रोजी बांग्लादेशात पायलट प्रोजेक्टच्या आधारावर सादर करण्यात आले होते. त्याच्यानंतर आता ‘कोरमो जॉब्स’ नावाने इंडोनेशियात ऍप सादर केले होते.

Related Stories

3 सप्टेंबर रोजी अर्थमंत्र्याची बँका-एनबीएफसीसोबत बैठक

Patil_p

कोरोना उपचारार्थ हेल्थ क्लेम 240 टक्के वाढला

Patil_p

आयसीआयसीआय लोम्बार्डचा मल्टी ट्रिप ट्रव्हल इन्शुरन्स

Patil_p

ई-वे बिलाचा कालावधी वाढविला

Patil_p

शेअर बाजारात तेजीची घोडदौड सुरुच

Patil_p

स्पाइस जेटला 600 कोटींचा फटका

Patil_p
error: Content is protected !!