तरुण भारत

कोल्हापूर जिल्हय़ात आज कोरोनाचे 23 बळी

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात गेल्या 24 तासांत कोरोनाने 23 जणांचा मृत्यू झाला. गुरूवारी 23 कोरोना मृत्यूंमुळे बळींची संख्या 485 वर पोहोचली आहे. सायंकाळपर्यत 538 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यतची पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 17 हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. दरम्यान, गुरूवारी दुसऱया दिवशीही कोरोनाने वीसहून अधिक बळींचा आकडा ओलांडला आहे.

जिल्हय़ात गुरूवारी कोरोनाने 23 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील अष्टविनायक कॉलनीतील 75 वर्षीय वृद्ध, भोने माळ येथील 55 वर्षीय पुरूष, विश्राम मळा येथील 75 वर्षीय वृद्ध, बंडगर मळा येथील 45 वर्षीय पुरूष, कबनूर येथील 61 वर्षीय आणि 67 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोल्हापूर शहरात शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये शिवाजी पेठेतील 67 वर्षीय वृद्धा, राजारामपुरीतील हॉस्पिटलमध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील चिपळूण येथील 88 वर्षीय वृद्धा, कसबा बावडा येथील 68 वर्षीय वृद्ध, महाराणा प्रताप चौकातील हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील नंदगाव येथील 32 वर्षीय तरूण, सांगली येथील हरिपूर रोडवरील 62 वर्षीय वृद्ध, राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथील 60 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये कसबा बावडा येथील 59 वर्षीय पुरूष, राधानगरी तालुक्यातील भोपळेवाडी येथील 70 वर्षीय वृद्ध, शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी येथील 60 वर्षीय वृद्धा, करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील 62 वर्षीय वृद्धा, गंगावेश येथील 90 वर्षीय वृद्धा, रविवार पेठेतील 72 वर्षीय वृद्ध, चंदगड येथील 78 वर्षीय वृद्ध, शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील 68 वर्षीय वृद्ध आणि कोल्हापुरातील जवाहरनगर येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे. कोरोना बळींची संख्या 486 वर पोहोचली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 174, नगरपालिका क्षेत्रात 173, कोल्हापूर शहरात 120 आणि अन्य 18 जणांचा समावेंश असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

आजअखेर 9 हजार 117 जणांना डिस्चार्ज

गुरूवारी सायंकाळपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 176 प्राप्त अहवाल आले. त्यापैकी 967 निगेटिव्ह तर 205 पॉझिटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगचे 946 अहवाल आले. त्यापैकी 817 निगेटिव्ह तर 129 पॉझिटिव्ह आणि खासगी लॅबमधील 156 पॉझिटिव्ह असे 490 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिह्यात आजअखेर 16 हजार 772 पॉझिटिव्हपैकी 9 हजार 117 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच 7 हजार 170 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
सायंकाळपर्यंत प्राप्त 490 पॉझिटिव्ह रूग्णांत आजरा 11, भुदरगड 6, चंदगड 6, गडहिंग्लज 8, गगनबावडा 1, हातकणंगले 82, कागल 11, करवीर 44, पन्हाळा 27, राधानगरी 4, शाहूवाडी 6, शिरोळ 36, नगर पालिका क्षेत्र 87, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 151 व इतर 10 जणांचा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नगर पालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 283, भुदरगड 355, चंदगड 473, गडहिंग्लज 422, गगनबावडा 39, हातकणंगले 1835, कागल 315, करवीर 1804, पन्हाळा 530, राधानगरी 410, शाहूवाडी 425, शिरोळ 842, नगर पालिका क्षेत्र 3444, महापालिका क्षेत्र 5185 असे 16 हजार 362 आणि इतर 410 असे 16 हजार 772 रुग्णसंख्या आहे. जिह्यातील 16 हजार 772 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 9 हजार 117 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 485 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 7 हजार 170 इतकी असल्याचे डॉ. केम्पीपाटील यांनी स्पष्ट केले.

Related Stories

राष्ट्रपती राजवटीची सर्व कारणे राज्य सरकारने पुर्ण केली – चंद्रकांत पाटील

Sumit Tambekar

पोटच्या मुलाला पित्याने पंचगंगेत फेकलं

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘कोरोना’चे 6 बळी, 354 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

चंद्रकांतदादांकडून शहरात जनसंवाद दौरा!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जयसिंगपूर पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी गुंडाप्पा पवार

Abhijeet Shinde

पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!