तरुण भारत

नोकरीचे आमिष दाखवून फसविणाऱया युवकास अटक

वार्ताहर / अथणी :

सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी अथणी पोलिसांनी बळवाड (ता. अथणी) येथील एकाला अटक केली आहे. मुऱयाप्पा ऐनापूर असे त्याचे नाव आहे.

Advertisements

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोजंदारीवर काम करणाऱया युवकांना हेरून त्यांना सरकारी कायमस्वरुपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष मुऱयाप्पाकडून दाखविण्यात येत होते. येथील एका आमदाराची ओळख सांगून त्यांच्यामार्फत ही नोकरी लावणार असल्याचे सांगत युवकांकडून पैशाची मागणी करायचा. मात्र, सत्ती व शेगुणशी येथील युवकांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुऱयाप्पा यास अटक केली. दरम्यान, अंगणवाडी येथे कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवित काही महिलांची मुऱयाप्पाने आर्थिक लुबाडणूक केल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

सेवा बजावताना निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

बेळगावमधील शिवभक्त तरुणांवरील राजद्रोहाचे गुन्हे मागे घ्या

Sumit Tambekar

उत्सव स्पेशल रेल्वे सुरू होण्याआधीच लागले ग्रहण

Patil_p

कॅम्प पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक

Patil_p

वाल्मिकी समाजाला 7.5 टक्के आरक्षण देण्याची मागणी

Patil_p

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

Amit Kulkarni
error: Content is protected !!