तरुण भारत

विरोधकांची विनाकारण भाजपवर आगपाखड

प्रतिनिधी /पणजी

गोव्यातील अमलीपदार्थांची कीड कायमची नेस्तनाबूत करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काम करीत असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते दामोदर नाईक यांनी केला आहे. विरोधक मात्र विनाकारण भाजपवर आगपाखड करीत असून सावंत यांच्या कारकिर्दीतच मोठय़ा प्रमाणात कोटय़वधींचे अमलीपदार्थ जप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

पणजीत भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सावंत हे समर्थपणे सरकार चालत असून त्यांच्यामुळेच रेव्ह पार्टी उधळण्यात पोलीस यशस्वी ठरले. ती पार्टी आयोजित करणारा गॉडफादर कोण ते शोधून काढावे अशी मागणी नाईक यांनी केली. झवेरी, शेट्टी यांच्या रेव्ह पार्टीवर पोलीस कारवाई झाल्यामुळे अनेक आमदार सैरभर झाले असून आपले कातडे वाचवण्यासाठी भाजपवर निराधार आरोप करीत सुटले आहेत. म्हणून रोव्ह पार्टीत अटक केलेल्या सर्वांची खोलवर चौकशी करून सत्य शोधावे, असे नाईक यांनी नमूद केले.

कोरोनाचे संकट, आर्थिक चणचण व इतर अनेक समस्यांना सामोरे जात डॉ. सावंत योग्य तऱहेरे कारभार चावलत असून कायदा सुव्यवस्था राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आर्थिक सहाय्यासाठी ते केंद्राकडे पाठपुरावा करीत असून पोलिसांच्या सहकार्याने अमलीपदार्थाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

सर्व गोमंतकीय जनतेला नाईक यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या असून कोरोनाचे संकट दूर करून जनतेला त्यातून मुक्त कर अशी प्रार्थना नाईक यानी गणरायाकडे केली आहे.

Related Stories

आंबेशी पुलाला झिलेटिनमुळे धोका

Omkar B

गुळेलीत सरकारी जमिनीत चिरेखाणीचा व्यवसाय

Patil_p

रमेश वंसकर यांच्या ‘फुलराणीस’ संत नामदेव बाल साहित्य पुरस्कार

Omkar B

प्रभाग फेररचनेला उशीर प्रकरणी अवमान याचिका फेटाळली

Patil_p

कोरोना प्रतिबंधक लसीची गोव्यात उद्या चाचणी

Patil_p

आमच्या उत्पन्नाच्या जागेत आयआयटी नको

Patil_p
error: Content is protected !!