तरुण भारत

काँग्रेसतर्फे सद्भावना दिन साजरा

प्रतिनिधी/ पणजी :

गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे गुरूवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 76 वी जयंती साजरी करण्यात आली. काँग्रेस पक्षातर्फे बांबोळी येथील राजीव गांधी यांच्या पुतळय़ाला पुष्पगुच्छ अर्पण करून सद्भावना शपथ घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस लुईझिन फालेरो, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष एम.के. शेख, सरचिटणीस विजय पै, वरद म्हार्दोळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements

पुतळय़ाला पुष्पगुच्छ अर्पण केल्यानंतर काँग्रेस भवन पणजी येथे राजीव गांधी जयंतीचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फ्रान्सिस्को सार्दिन, शंभू भाऊ बांदेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी यांचे गोव्याच्या जडण घडणीत तसेच विकासात मोलाचे योगदान आहे. आधुनिक गोव्याचे शिल्पकार म्हणून त्यांची ख्याती होती. कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची त्यांची वृत्ती होती. त्याप्रमाणे प्रत्येकाने मिळून मिसळून काम करणे गरजेचे आहे असे मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Stories

चोवीस तासांत 631 बाधित

Amit Kulkarni

मुस्लीमवाडा, नागझर डिचोली येथे बेकायदा गोमांस जप्त

Omkar B

‘त्या’ तरूणांच्या कौशल्यामुळेच बुडणाऱया इसमाला जिवनदान

Amit Kulkarni

सार्वजनिक गणपतींनी घेतला दीड दिवसांतच निरोप

Omkar B

सांखळी पालिकेत पुन्हा एकदा सत्ता संघर्ष होण्याची शक्मयता

Amit Kulkarni

मालवाहू ट्रकचा फाळका सुटून अर्धा ट्रक पॉटेश वास्कोतील रस्त्यावर

Amit Kulkarni
error: Content is protected !!