तरुण भारत

तेलंगणा : भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये भीषण आग

ऑनलाईन टीम / तेलंगणा : 

तेलंगणातील भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत 8 कर्मचारी अडकले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. 

Advertisements

तेलंगणातील श्रीशैलम धरणावरील किनाऱ्यावर हा भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. या प्लांटमध्ये सहा पॉवर जनरेटर आहेत. चौथ्या पॅनेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. तेथील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने आग विझवणे अशक्य झाले. 

आग लागली तेव्हा या पॉवर प्लांटमध्ये तेलंगण राज्य वीज निर्मिती महामंडळाचे 25 कर्मचारी काम करत होते. त्यामधील काही कर्मचाऱ्यांची एनडीआरएफच्या पथकाने सुटका केली आहे. मात्र, 8 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Related Stories

दिल्लीत गेल्या 24 तासात 1647 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 116993 वर

Rohan_P

राजस्थान : पूर्ण डिसेंबर महिन्यात ‘या’ जिल्ह्यांत असणार नाईट कर्फ्यू

Rohan_P

अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा रायचे निधन

datta jadhav

बंगालमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस-डाव्यांना भोपळा

Patil_p

कोरोनावरील ‘मोलनुपिरावीर’ गोळी होणार लाँच

datta jadhav

नव्या कोरोना स्ट्रेनमुळे शेअर बाजार गडगडला

Patil_p
error: Content is protected !!