तरुण भारत

कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

-आमदार पाटील यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

कोरोना महामारीचा शिरकाव दिवसेंदिवस राजकीय वर्तुळातही होताना दिसत आहे. आजतागायत अनेक आमदार, मंत्री, खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः ऋतुराज पाटील ट्विटद्वारे दिली आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. गुरुवारी रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. पण न घाबरता कोरोना महामारीला रोखण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने धैर्याने सामोरे जावून लढा द्यावा. स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे .प्रशासन आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यालाही सहकार्य करावे. लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे

Related Stories

आशियाई मुलींच्या रग्बी स्पर्धेत भारताची शानदार कामगिरी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शेंडा पार्कात १८ लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : केके गँगचा म्होरक्या कांबळेसह तिघांना पोलीस कोठडी

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे ९ बळी, ३०२ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोविड केअर, हेल्थ सेंटरसाठी सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

जयश्री जाधव यांची बिनविरोध निवड, हीच खरी श्रद्धांजली

Sumit Tambekar
error: Content is protected !!