तरुण भारत

पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी तेजस्विनी शिंदे

पन्हाळा/प्रतिनिधी

पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तेजस्वीनी रणजित शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार रमेश शेंडगे होते.सौ.शिंदे यांची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

पन्हाळा पंचायत समितीवर एकहाती जनसुराज्यशक्ती पक्षाची सत्ता आहे.सध्या सभापती पद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.त्यानुसार या आधी गीतादेवी पाटील यांची सभापती पदी वर्णी लागली होती.पण पक्षाच्या धोरणानुसार त्यांनी आपला कार्यकाळ पुर्ण झाल्यावर सभापती पदाचा राजीनामा दिला.त्यामुळे सभापती पद रिक्त झाले होते. यासाठी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी शिंदे यांच्या नाव निश्चित केले.त्यामुळे तेजस्विनी शिंदे यांच्या निवडीची औपचारिकताच शिल्लक राहिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने सभापती निवडीसाठी पंचायत समितीची आज विशेष सभा घेण्याचे आदेश दिले होते.सकाळी 11:00 वाजता सौ.शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.अर्जाची छाननी होवुन अर्ज वैद्य ठरविण्यात आला.त्यातच उमेदवारी अर्ज स्वीकरण्याच्या मुदतीपर्यंत इतर कोणाचाही अर्ज न आल्याने तेजस्विनी शिंदे यांची सभापतीपदी  बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रमेश शेंडगे यांनी घोषित केले.

यावेळी मावळत्या सभापती गीतादेवी पाटील व उपसभाती रश्मी कांबळे यांच्या हस्ते नुतन सभापती तेजस्विनी शिंदे यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यानंतर नुतन सभापती यांचा कार्यालयीन प्रवेश पार पडला.यावेळी माजी सभापती प्रुथ्वीराज सरनोबत, अनिल कंदुरकर, संजय  माने, वैशाली पाटील, उज्ज्वला पाटील, गटविकास अधिकारी तुलशिदास शिंदे यांच्यासह जनसुराज्यशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान ही निवड बिनविरोध पार पडल्याबद्दल नुतन सभापती सौ.शिंदे यांनी सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले.

Advertisements

Related Stories

वारणेच्या बंधारे दुरूस्तीसाठी दहा कोटींचा निधी : जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहराच्या नवीन विकास आराखड्यातकॉमर्स’आणिइंडस्ट्री’ला प्राधान्य

Abhijeet Shinde

बहिरेश्वर सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती

Abhijeet Shinde

केकतवाडी गावास 35 लाख 80 हजार पेयजल योजनेतून मंजूर

Abhijeet Shinde

बलात्कार प्रकरणी कोडोलीच्या तरुणास अटक

Sumit Tambekar

‘आमचं ठरलंय’ला ‘आम्हाला पटलंय’ने प्रत्युत्तर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!