तरुण भारत

माजी सैनिकाने डोक्यात गोळी मारुन घेवून केली आत्महत्या

राजेंद्र होळकर : कोल्हापूर

शहरातील जीवबा नाना पार्कमधील रायगड चौकात राहणाऱ्या एका माजी सैनिकाने स्वतःहून पिस्तुलातून डोकीत गोळी मारुन घेवून आत्महत्या केली. दिनकर पांडूरंग मगदूम ( वय ४५ ) असे त्यांचे नाव आहेफ या घडल्या घटनेने जीवबा नाना पार्कमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याची नोंद पोलिसात झाली आहे.
माजी सैनिक दिनकर मगदूम काही महिन्यापूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांची पत्नी व मुले काही दिवसांपूर्वी पाचगाव ( ता. करवीर ) येथे राहत असलेल्या भावाकडे राहण्यास गेली आहेत. त्यामुळे ते घरी एकटेच राहत होते. यावेळी त्यांनी स्व:ताच्या पिस्तुलातून डोकीत गोळी मारुन घेवून आत्महत्या केली. या घडल्या घटनेची माहिती समजताच करवीरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related Stories

कृष्णा नदीत तरुण बुडाला

Abhijeet Shinde

शाहूवाडीत लॉकडाऊन कायम; उल्लंघन केल्यास कारवाई

Abhijeet Shinde

चंदगड संघाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी अकरा लाखांचा निधी

Abhijeet Shinde

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे विज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

Abhijeet Shinde

करवीर विधानसभा मतदार संघ विकासाचे मॉडेल बनवू – जि.प.सदस्य राहुल पाटील

Abhijeet Shinde

जयसिंगपुरात पोलीस ठाण्यातूनच 185 मोबाईल लंपास

prashant_c
error: Content is protected !!