तरुण भारत

रूप गणेशाचे….देई बीज संस्काराचे…..

हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिता, विघ्नांचा नियंत्रक मानले जाणारे दैवत म्हणजे गणपती! आपल्या प्रत्येकालाच कळायला लागल्यावर पहिले देवाचे दर्शन घडविले जाते अथवा ओळख करून दिली जाते ती गणपती बाप्पाचीच! त्यामुळेही असेल लहानपणापासून बाप्पाशी आपले एक अनोख नाते निर्माण होते. शालेय जीवनात ‘आवडता सण’ हा निबंध आला तर अर्थातच ‘गणेश उत्सव’ असे अनेक जण लिहायचे. आजही लिहितात. आपण जसजसे मोठे होत जातो तसे निबंधापुरत्या मर्यादित असलेल्या गणरायाचे विविध गुणविशेष समजू लागतात तसतसे गणरायाशी असलेले नाते आणखीनच घट्ट बनू लागतात. गणपती ही संघटनेची देवता मानली जात असल्याने अर्थातच विविध सार्वजनिक मंडळांनी साकारलेले गणपतीचे रूप या गणेश उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक हिंदू नागरिकाच्या मनात रूजू लागले. ‘गणेश उत्सव’ नेहमीच मनात एक वेगळेच चैतन्य व प्रसन्नता घेऊन येतो.

गणेश उत्सव जवळ आल्याने दुकानातून गणेशाच्या मोहक मूर्ती दिसू लागल्या आहेत. कोरोना संकटामुळे शासकीय आदेशाप्रमाणे यावेळी श्रींच्या मूर्तींचे आकार थोडे लहान ठेवण्यात आले आहेत. गणरायाच्या या मोहक रूपाच्या दर्शनाने कोरोनामुळे एक प्रकारची आलेली मानसिक व शारीरिक मरगळ कमी झाल्याचे जाणवते आहे.

Advertisements

 गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र कसा झाला व त्याला गजमस्तक कसे जडले, या संबंधात पुराणकारांमध्ये एकवाक्यता नाही. बऱयाच कथा सांगितल्या गेल्या आहेत. तरी सर्वपरिचीत कथा…..

 एकदा पार्वती स्नानगृहात स्नान करीत होती. त्याप्रसंगी आपल्या अंगाचा मळ काढून तिने एक बालक बनविला व त्याला स्नानगृहाच्या दारावर द्वाररक्षक म्हणून उभे केले. थोडय़ाचा वेळात शंकर तिथे आले व ते स्नानगृहात जाऊ लागले. द्वाररक्षक बालकानेच त्याला अडवले. तेव्हा शिवाला त्याचा राग आला आणि त्याने त्याचे मस्तक उडविले. ही दुर्घटना पाहून पार्वतीला दु:ख झाले. मग तिच्या सांत्वनाकरिता शिवाने इंद्राच्या हत्तीचे मस्तक आणून त्या शिरहीन देहाला जोडले. तोच गणपती होय.

आज आधुनिक काळात या कथेकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहताना हे एक
विश्व्ा्रातील अवयव दानाचे सर्वोत्तम उदाहरण म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. आज अवयव दानामुळेच गणपतीसारखे दैवत आपल्याला लाभले हे विसरून चालणार नाही. अवयवदानापेक्षा सर्वश्रे÷ दान असूच शकत नाही असा संदेश गणरायांनी मानवजातीला दिल्याचा भास होतो आहे.

 गणरायाने सर्वांपेक्षा वेगळे रूप धारण करून स्वत: असे एक वेगळे अस्तित्व या भूतलावर निर्माण केले आहे. हत्तीचे तोंड, कान, डोळे, सोंड एकत्रित असलेले गजवदन आपल्या सर्वांना माहीत आहेच. असे हे सर्वपरिचित गणरायाचे रूप धारण करण्यामागील बऱयाच कथाही आपल्याला परिचित आहेत. असे म्हटले जाते की गजमुखच धारण करण्यामागे ज्ञानाच्या आधारे अतिशय गहन आध्यात्मिक अर्थ आहे.

हत्तीचे डोके… मानवाला ज्ञात असलेल्या प्राण्यात सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून हत्ती गणला जातो. हत्तीचा भालप्रदेश विशाल असून त्याची बुद्धी अतिशय तल्लख असते.

हत्तीची सोंड…इतकी मजबूत व ताकदवान असते की त्याद्वारे तो एखादा वृक्षही  सहज उखडू शकतो तसेच हत्तीत इतका नम्रपणापण असतो की हीच सोंड वर करून तो एखाद्या बालकाला प्रणामही करतो.

सुपासारखे कान…मोठे कान हे एकाग्रतेचे प्रतीक मानले आहे.

हत्तीचे डोळे… बारीक दिसणाऱया गोष्टी पायाखाली तुडवल्या जाऊ नयेत म्हणून हत्तीच्या डोळय़ांना छोटय़ा गोष्टीही मोठय़ा दिसतात.

एकदन्त…गणपतीला एकच सुळा दाखवला आहे तो कुणाची हानी करण्यासाठी नसून विघ्न आणाऱया व्यक्तींना भीती दाखवण्यासाठी आहे असे म्हटले जाते.

 विद्येच्या देवतेने म्हणूनच गजमुख धारण करण्यास प्राधान्य दिले असावे. गजाननाच्या अशा मोहक रूपातच संस्कारांचे बीज रूजले आहे असे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. कोणत्याही परिस्थितीत गर्भगळीत न होता आपल्या बुद्धीच्या जोरावर विपरीत परिस्थितीवर मात करणे व सत्य ज्ञान धारण केले असता त्यास गणरायाच्या सोंडेइतके बळ प्राप्त होते. ज्ञानसाधनेत एकाग्रतेला महत्त्व असून श्रवण, मनन व निदिध्यास हेच खरे पुरुषार्थ आहेत. सरळमार्गी जाणाऱया ज्ञानी मनुष्यास एकदन्ताप्रमाणे विघ्न आणणाऱया व्यक्तीतही आपला स्वत:चा दरारा निर्माण करण्याची क्षमता निर्माण होते तसेच गजाननाच्या हाती दाखवलेल्या कुऱहाडीप्रमाणे वाईट गोष्टी मुळापासून उखडण्याची त्यात क्षमता असते, गणरायाच्या डोळय़ांप्रमाणे ज्ञानी व्यक्ती छोटय़ामध्येही मोठेपण शोधते म्हणूनच अशी व्यक्ती प्रत्येकाचा आदर राखते, अशा ज्ञानी व्यक्ती परिश्रम, तपस्या आणि बुद्धिबळाच्या आधारावर सफलता प्राप्त करतात.  याचे प्रतीक म्हणून गणरायाच्या एका हातात मोदक दाखवण्यात आला आहे असा बोध गणरायाच्या साकारलेल्या रूपातून आपणास मिळतो. अशा या विविध गुणांचा एकत्रित संगम असलेल्या गणरायाची पूजा करून या सर्व गुणांना आपल्यात धारण करण्याचा प्रयत्न केल्यास मनुष्यास आध्यात्मिक प्रगती करणे शक्मय होईल असे म्हटले जाते.

यावषी आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सणावारांवर संकटांचे मळभ पसरले आहे परंतु गणरायाच्या आगमनाने हे मळभ लवकरच दूर होईल असा आज आपल्या  प्रत्येकालाच विश्व्ा्रास आहे. गणरायाची मनोभावे पूजा करून सत्त्वगुणांचा अंगिकार केला असता कोणत्याही संकटांवर आपण मात करू शकू यात शंकाच नाही.

मराठी भाषेमधील आद्य वाङ्मयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो..

तेया गणरायाचे उदार रूपडे

थोरपण जिंकले होडे ।

कवीस शब्दब्रह्मीची राणिव

कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे !

गोर मेरु जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग,

नानाविध वसती भोग!

तेण आधारे अग्नेय सुखावले ।।

   डॉ. शुभदा कामत, पुणे

Related Stories

ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे!

Patil_p

राजकारणातली खूबसूरती आणि बदसूरती

Patil_p

पंतप्रधानांकडून श्रील प्रभुपादांचा गौरव

Patil_p

ग्रोफर्सची हिस्सेदारी घेण्याच्या तयारीत पेटीएम मॉल

Patil_p

ऐकावं ते नवलच

Patil_p

विचार रत्नाकर!

Patil_p
error: Content is protected !!