तरुण भारत

सोलापूर : आमदार सुजितसिंह ठाकूर कोरोनामुक्त

प्रतिनिधी / बार्शी

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर आणि त्यांचा परिवार आज कोरोणा मुक्त होऊन घरी गेला आहे. आमदार सुजित सिंह ठाकूर हे 12 दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर त्यांच्या परिवाराची चाचणी घेण्यात आली त्यात आमदार सुरेश ठाकूर यांच्या सह 11 कुटुंबीय यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याना व त्यांच्या कुटूंबीय यांना बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल केले होते. आज त्यांना व त्याच्या कुटुंबियांना कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले. या वेळी बार्शीत कॅन्सर हॉस्पिटलला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले या मुळे हॉस्पिटल डॉक्टर , स्टाफ आणि प्रशासन अधिकारी यांचे आभार मानले.

Related Stories

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारणार

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये १०२ नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर : वैराग भागात राजरोसपणे मटका ,जुगारसह अनेक अवैध्य व्यवसाय सुरूच

Abhijeet Shinde

नुकसानीचा राजकीय ‘पंचनामा’

Abhijeet Shinde

आषाढी वारीचे नियोजन नेटकेपणाने करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!