तरुण भारत

ऑस्ट्रेलियन संघात एलीस पेरीला स्थान

मेलबोर्न / वृत्तसंस्था

येत्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाचा 18 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला असून अष्टपैलू एलीस पेरीचा समावेश करण्यात आला आहे. एलीसला यापूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे तंदुरूस्ती चाचणीनंतरच तिचा संघातील समावेश निश्चित होईल.

Advertisements

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. 2019 साली ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंडचा 3-0  असा पराभव करून वनडे मालिका जिंकली होती.

ऑस्ट्रेलिया महिला संघ- मेग लॅनींग (कर्णधार), हेन्स (उपकर्णधार), ब्राऊन, बर्न्स, कॅरे, गार्डनर, हिली, जोनासेन, किमेन्सी, मॅकग्रा, मोलीनेक्स, मुनी, एलीस पेरी, स्कूट, स्ट्रेनो, सदरलॅन्ड, वेरहॅम आणि वेकारेवा

Related Stories

मनातले बोलले नाही तर दुःख वाढते

Rohan_P

एक चतुरस्त्र अभिनेता दिलीपकुमार

Omkar B

साखर कारखान्याने थकबाकी द्यावी

Amit Kulkarni

बकऱयांचा बाजार तेजीत

Patil_p

समाधानकारक बरसात, शेतकऱयांची धांदल

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयातर्फे टिळक पुण्यतिथीचे आचरण

Patil_p
error: Content is protected !!