तरुण भारत

चिंताजनक : देशात २४ तासांत ६९ हजार कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशातील कोरोना बाधितांचा वाढता वेग कायम आहे. दिवसागणिक वाढणारी ही संख्या चिंतेची बाब बनत आहे. देशात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक ६९,८७८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण संख्या २९.७५ लाख पार गेली आहे. तर ९४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

Advertisements


यातील ६ लाख ९७ हजार ३३० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर आतापर्यंत २२ लाख २२ हजार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ५५ हजार ७९४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १० लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Stories

दिल्ली : कोविशिल्डचा साठा संपला; काही लसीकरण केंद्रे आज होणार बंद

Rohan_P

देशात गेल्या 24 तासात 1553 नवे रुग्ण, 36 जणांचा मृत्यू

prashant_c

नाशिक : शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर जिल्हा रुग्णालयात दाखल

Rohan_P

लादेनचा खात्मा करणारे शूर आयटीबीपीमध्ये

Patil_p

राम जन्मभूमी ट्रस्ट : एक विश्वस्त दलित समाजातील : अमित शहा

prashant_c

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची चपराक

datta jadhav
error: Content is protected !!