तरुण भारत

सातारा जिल्ह्यात जागर अस्मितेचा अभियान सुरू

सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढवण्यासाठी महिला बचत गटांद्वारे कार्यवाही

प्रतिनिधी / सातारा

ग्रामीण भागातील महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनबाबत जनजागृती करून त्यांचा वापर वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा सज्ज झाली आहे. महिलांना घरबसल्या सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण जीवनोन्नाती अभियानामार्फत जागर अस्मितेचा हे अभियान सुरू करण्यात आले. महिला बचत गटाद्वारे केवळ 24 रूपयांत आठ सॅनिटरी नॅपकीन देण्यात येतील.

महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वापरण्याबाबत अनेक गैरसमजुती आहेत. मासिक पाळी दरम्यान महिला नॅपकीनचा वापर टाळतात. यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नॅपकीन वापरने आरोग्यास हितकारक असल्याने त्याचे फायदे कळावेत. आणि आरोग्यसंदर्भात जनजागृती होऊन महिलांना घरच्या घरीच ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा गावपातळीवर पोहचली आहे.

जिह्यातील सर्व गावांत हजारहून अधिक महिला बचत गटांद्वारे ही कार्यवाही करण्यात येईल. बचत गटांची नोंदणीही ग्रामीण विकास यंत्रणेकडे झालेली आहे. बचत गटांच्या महिलांना त्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामधून बचत गटांनाही चार पैसे फायदा मिळणार आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत गावोगावच्या महिलांपर्यंत हे नॅपकीन पोचवण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा कार्यवाही करत आहे.

Advertisements

Related Stories

प्रतिष्ठेची बनलेल्या जिल्हा बँकेसाठी आज मतदान

Patil_p

नगरपालिकांमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपोषण

datta jadhav

कास पठारावर वशिलेबाजांना मिळतोय विनाशुल्क प्रवेश

datta jadhav

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवी मुंबई महापालिका संघास विजेतेपद

Patil_p

फुल बाजार कोमेजला

Patil_p

सातारा : शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे पालन करुन नूतन वर्षाचे स्वागत करावे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!